
मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनचा सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. या पाठोपाठ 80 हजार नोकऱ्या देणाऱ्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला. या दोन प्रकल्पांपाठोपाठ टाटा एअरबसचा नागपुरात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तसेच सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्पही आता हैदराबादला गेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळे हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप करत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी प्रसिद्ध करत प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
या नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निमिर्तीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.