Year Ender 2025 : महत्वाच्या टुर्नामेंटआधी ज्या खेळाडूचा टीम इंडियातून पत्ता कट केला, वर्ष 2025 मध्ये शतकांच्या बाबतीत तोच टॉपवर
Most Hundred For India In 2025 : वर्ष 2025 मध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकवण्याच्या बाबतीत एक 26 वर्षांचा फलंदाज टॉपवर आहे. या खेळाडूने कॅलेंडर ईयरमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा दुप्पट शतकं झळकावली आहेत.

Most Hundred For India In 2025 : वर्ष 2025 भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. याच वर्षी टीम इंडियाने 2 मोठे किताब जिंकले. वनडे फॉर्मेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी 20 फॉर्मेटमध्ये आशिया कप ट्रॉफी जिंकली.फलंदाजीच्या हिशोबाने हे वर्ष शानदार ठरलं. टीम इंडियाकडून अनेक फलंदाजांनी कमाल प्रदर्शन केलं. क्रिकेट जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. वर्ष 2025 मध्ये भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकवण्यामध्ये एक 26 वर्षांचा खेळाडू सर्वात पुढे होता.
या कॅलेंडर वर्षात टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिलने कमालीच प्रदर्शन केलं. इंटरनॅशन क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि टी 20I मध्ये भारताकडून सर्वाधिक शतक झळकवली. गिलने संपूर्ण वर्षभरात सात शतकं ठोकली. जे कुठल्याही अन्य भारतीय फलंदाजांपेक्षा जास्त आहेत. टेस्टमध्ये त्याने सर्वाधिक 5 शतकी इनिंग खेळल्या. वनडेमध्ये दोन शतकं झळकावलीत. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही भारतीय फलंदाज या वर्षभरात पाच शतकं झळकवू शकला नाही.
अलीकडेच टी 20 टीमचा उप कर्णधार होता
शुबमन गिल सध्या टीम सिलेक्शनमुळे खूप चर्चेत आहे. बीसीसीआयने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी निवडलेल्या टीममध्ये गिलचा समावेश केलेला नाही. गिल अलीकडेच टी 20 टीमचा उप कर्णधार होता. पण टी 20 मध्ये सरासरी प्रदर्शनामनुळे सिलेक्टर्सना त्याला बाहेर करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. वर्ष 2025 मध्ये तो 15 टी 20I सामने खेळला. 24.25 च्या सरासरीने त्याने फक्त 291 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून एकही शतक निघालं नाही.
कुठल्या खेळाडूने किती शतकं झळकवली?
वर्ष 2025 मध्ये शुबमन गिलनंतर सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू आहे यशस्वी जैस्वाल. त्याने या कॅलेंडर वर्षात एकूण 4 सेंच्युरी मारल्या. वनडे करिअरमधील पहिलं शतकी इनिंग सुद्धा खेळला. विराट कोहली 3 शतकासह या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. केएल राहुल सुद्धा या कॅलेंडर वर्षात 3 शतकी इनिंग खेळला. रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने प्रत्येक 2-2 शतकं झळकवली.
