AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुढच्या वर्षी आम्हीच परत येणार’, Tv9 च्या ‘आपला बायोस्कोप’ सोहळ्यात फडणवीसांचं मोठं विधान

देवेंद्र फडणवीस यांनी 'टीव्ही 9 मराठी'च्या 'आपला बायोस्कोप 2023' पुरस्कार सोहळ्यात भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात सध्या शिवसेना-भाजप युतीचं सरकार आहे. पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. पण या निवडणुका जिंकून महायुतीचंच सरकार महाराष्ट्रात येईल, असा मोठा दावा फडणवीसांनी केला.

'पुढच्या वर्षी आम्हीच परत येणार', Tv9 च्या 'आपला बायोस्कोप' सोहळ्यात फडणवीसांचं मोठं विधान
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 09, 2023 | 10:15 PM
Share

मुंबई | 9 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘आपला बायोस्कोप 2023‘ या पुरस्कार सोहळ्यात भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. खरंतर या घटनांची सुरुवात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाली, असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून ते आतापर्यंत राजकारणात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. त्यानंतर आता भविष्यात पुढे काय घडणार ते महत्त्वाचं आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. या राजकीय घडामोडींच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपणच सत्तेत असू, असा मोठा दावा फडणवीसांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या कार्यक्रमात केला आहे.

‘टीव्ही 9 मराठी’चा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांच्या सन्मानाचा पहिला ‘आपला बायोस्कोप’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी फडणवीसांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सूचक वक्तव्य केलं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“तुम्ही पहिल्या वर्षी आम्हाला बोलवलं. पुढच्या वर्षी आम्हालाच बोलवा. पुढच्याही वर्षी डिसेंबरमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मीच राहणार आहे. अर्थात याला एक कॅव्हिट आहे, रितेशजी राजकारणात यायचं नाही आणि आलात तर कुठून यायचं ते मी तुम्हाला सजेस्ट करतो. आमच्यासोबत अजित दादांनाही बोलवा तेही एक वेगळे कलाकार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“टीव्ही 9 मराठी न्यूज चॅनल अत्यंत वेगाने पुढे जाणारं न्यूज चॅनल आहे. आमचा इतका वैताग होतो की, तुमचे इतके कॅमेरामॅन आहेत. कुठेही गेलं तरी टीव्ही 9 चा कॅमेरामॅन येऊन उभाच असतो. तुम्ही सगळ्या गोष्टी टिपून घेता. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला ते माहिती आहे, न्यूज चॅनल पेक्षा जास्त लोकांचा इंटरेस्ट मनोरंजनाकडे आहे. लोकं राजकारण पाहून कंटाळतात. त्यामुळे माझा सल्ला आहे की, तुमच्या न्यूज चॅनलवर जास्त भर हा मनोरंजनाला देऊन टाका. 25 टक्के न्यूजकरता ठेवा”, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...