‘महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ’, सोलापुरातल्या राड्यावरुन देवेंद्र फडणवीसांची टीका

| Updated on: Nov 22, 2020 | 4:37 PM

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे (Devendra Fadnavis criticize MVA Govt.)

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, सोलापुरातल्या राड्यावरुन देवेंद्र फडणवीसांची टीका
Follow us on

अमरावती : महाविकास आघाडीच्या सोलापूरमधील प्रचार सभेत झालेल्या राड्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या गोंधळाची दखल घेत विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते अमरावती येथे विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचाराला आले होते. ( Devendra Fadnavis criticize MVA Govt.)

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. “तीन पक्षांमध्ये झालेली ही नैसर्गिक आघाडी नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्याने यांच्यात गोंधळ उडत राहणार आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सोलापूरममध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सभा आयोजित केली होती. त्यावेळी सभास्थळावरील फलकावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेस कार्यकरत्यांनी गोंधळ घातला होता. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र सोडले. (Devendra Fadnavis criticize MVA Govt.)

भाजप स्वबळावर लढणार

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचे भाजप नेत्यांकडून संकेत देण्यात येत असले तरी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी अमरावतीत आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही शक्यता फेटाळली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करून त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. फडणवीस यांच्या या विधानामुळे भाजप आणि मनसेची युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Devendra Fadnavis criticize MVA Govt.)

वीजबिलावरुन महाविकासआघाडीवर टीकास्त्र 

राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी अमरावतीत केली. तर हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटते,लॉकडाऊनमध्ये वीज बिलात सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या. तीन कॅबिनेट मंत्र्यांनी याची घोषणा केली होती. आता म्हणाले अभ्यास झाला नाही त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली.

लॉकडाऊनमध्ये आलेली वीजबिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी लोकांचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी केली. (Devendra Fadnavis criticize MVA Govt.)

दरम्यान,वीजबिलांच्या मुद्यांवरुन भाजप आक्रमक झालं असून सोमवार (23 नोव्हेंबर) पासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे.


संबंधित बातम्या: 

राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार; फडणवीसांनी मनसेसोबत युतीची शक्यता फेटाळली

(Devendra Fadnavis criticize MVA Govt.)