AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री’ गुगलने युजर्सना गंडवलं की गुगलच गंडलं?

Devendra Fadnavis Google Search : गुगलवर देवेंद्र फडणवीस असं सर्च केल्यावर समोर येणारी माहिती अनेकांना चकीत करतेय.

Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री' गुगलने युजर्सना गंडवलं की गुगलच गंडलं?
देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 07, 2022 | 7:57 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकार आलं. यालाही आता महिना उलटला. अवघ्या देशाला फडणवीस मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) नव्हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy Chief Minister) आहेत, हे आता कळलं. पण गुगल काही हे मान्य करायला तयार नाही. गुगलवर देवेंद्र फडणवीस असं सर्च केल्यावर समोर येणारी माहिती अनेकांना चकीत करतेय. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे गुगल गंडलंय, की गुगल गंडवतंय, अशा चर्चांना उधाण आलंय. 30 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नववे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर 2014 ते 2019 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. दरम्यान, आता गुगलच्या टेक्निकल चुकीमागे ह्युमन एरर आहे की आणखी काही, यावरुन चर्चांना उधाण आलंय. सोशल मीडिया युजर्सचं याकडे लक्ष वेधलं गेलं नाही, तरच नवल!

…आणि ते पुन्हा आले!

मी पुन्हा येईन, वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही नवं सरकार आल्यानंतर विधानसभेमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होती, असं चित्र महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान तयार झालं होतं. पण घडलं वेगळंच.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यानंतर ते सूरत, मग गुवाहाटी आणि अखेर गोव्यात बंडखोर आमदारांना घेऊन गेले. त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे मुंबईत बंडखोरी केल्यानंतर परतले, तेव्हा घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेने सगळेच हादरुन गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असेल, हे स्पष्ट केलं. यानंतरत महाराष्ट्रातील जनतेला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला होता. शिवाय आपण मंत्रिमंडळात नसू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आपण बाहेरुन सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं.

पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने राजकारणातील ट्वीस्ट एन्ट टर्न्स एकाच दिवशी अनुभवले होते. दरम्यान, आता गुगलवर दिसत असलेली माहिती लवकरच सुधारली जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जातेय. पण तोपर्यंत गुगलच्या या चुकीवर मीम्स बनले गेले, तर आश्चर्य वाटायला नको.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.