Devendra Fadnavis : संदीप जोशींकडून देवेंद्र फडणवीसांच्या शुभेच्छांचे होर्डिंग, अमित शहा यांचा फोटो गायब, कारण काय?

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे भावनिक होर्डिंग लागले. त्यापैकी एक महत्वाची होर्डिग लावली, ती संदीप जोशी या देवेंद्र फडणवीस यांच्या मित्रानं. जोशी होर्डिंगमध्ये म्हणतात, प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार. तुझ्या पुढे आम्ही खुजे खुजे आहोत. तुला आमचा सलाम. अशा आशयाचे भावनिक होर्डिंग लावण्यात आलेत.

Devendra Fadnavis : संदीप जोशींकडून देवेंद्र फडणवीसांच्या शुभेच्छांचे होर्डिंग, अमित शहा यांचा फोटो गायब, कारण काय?
अमित शहा यांचा फोटो गायब
| Edited By: | Updated on: Jul 01, 2022 | 5:33 PM

नागपूर : देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या जवळचे मित्र आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देत असताना होर्डिंगवरून चर्चेला उधाण आलंय. कारण या होर्डिंगमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा फोटो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर अमित शहा यांचा फोटो असणे अपेक्षित होते. पण, तो फोटो या होर्डिंगमध्ये दिसत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा फोटो आहे. मात्र, अमित शहा यांचा फोटो नसल्याचं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

अमित शहांचा फोटो का नाही?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. पण, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असं सांगितलं. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री विराजमान करण्यात आलं. फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून का रोखण्यात आलं. यामाग अमित शहा तर नाहीत ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळंच कदाचित अमित शहा यांचा फोटो माजी महापौर संदीप जोशी यांनी या होर्डिंगमध्ये वापरला नसावा.

होर्डिंगमध्ये काय लिहिलंय

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे भावनिक होर्डिंग लागले. त्यापैकी एक महत्वाची होर्डिग लावली, ती संदीप जोशी या देवेंद्र फडणवीस यांच्या मित्रानं. जोशी होर्डिंगमध्ये म्हणतात, प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार. तुझ्या पुढे आम्ही खुजे खुजे आहोत. तुला आमचा सलाम. अशा आशयाचे भावनिक होर्डिंग लावण्यात आलेत.

फडणवीसांची उंची वाढली

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. याचं कारण भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे होय. त्यातही अमित शहा यांनीच फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं, फडणवीस यांनी स्वतःच्या गळ्यातील मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे फडणवीस यांची उंची वाढली.