Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्री फडणवीसांची बोळवण का करण्यात आली? 3 अँगल फार महत्त्वाचेत!

भाजप पक्ष हा कुण्या व्यक्तिकेंद्रीत असणारा पक्ष नाही. पक्षाच्या विरोधात किंवा पक्ष आदेशाचे पालन करीत नाही त्याचे काय होते याची अनेक उदाहरणे भाजपामध्ये आहे. पक्षाची शिस्त आणि नियम पध्दतीनुसारच सर्वकाही होणार. एखाद्या व्यक्तिमुळे यामध्येय बदल होणार नाही. शिवाय पक्षाचे कंट्रोल कुण्या एकाच्या हाती नाही तर यंत्रणेतील सर्वांच्या विचाराने ठरते तेच मांडले जाते हेच यान निर्णयातून दाखवून देण्यात आले आहे.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्री फडणवीसांची बोळवण का करण्यात आली? 3 अँगल फार महत्त्वाचेत!
भाजपामध्ये पक्षाचा आदेश हाच प्रमाण मानला जातो.
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:11 PM

मुंबई :  (Maharashtra Politics) राज्यातील राजकीय नाट्यानंतर आता कुठे चर्चेला पूर्णविराम मिळेल असे वाटत होते. पण अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदामध्ये झालेल्या बदलाने विविध अंगाने चर्चा रंगू लागली आहे. सर्वसामान्यांच्याच नाही तर अगदी (BJP) भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात देखील देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील असा अंदाज होता. पण ऐन वेळी (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरट्रोक दिला आणि मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे असतील याची घोषणा केली. तेव्हापासून विविध प्रश्नांचे वावटळ अगदी सर्वसामान्याच्या मनातही उटले आहे. पण यामधून (BJP Party) भाजप पक्षाची ध्येय, धोरणे आणि भविष्यातील वेध या सर्वांचा विचार केला गेल्याची चर्चा आहे तर या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ज्यासाठी एवढा अट्टाहास सुरु होता त्य़ालाच भाजपाने का धुडकावले हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. याचे विश्लेषण विविध अंगाने करता येऊ शकते पण यातील तीन अंग महत्वाचे आहेत.

पक्षापेक्षा कोणी मोठा नाही

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपामध्ये कोणीही पक्षापेक्षा मोठा नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सर्वसामान्य जनतेसह राजकीय नेत्यांना देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राहणार याबाबत बोलून दाखवायचीही गरज नव्हती. मात्र, ऐनवेळी त्यांना उपमुख्यमंत्री पदावर रहावे लागले तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथन शिंदे यांनी शपथ घेतली. यामागे पक्षाची काही ध्येय-धोरणे असतील पण याबद्दल पक्षातील कोणीही चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे इतर पक्षात नाराजी, बंड याची दखल घेतली जाईल पण भाजपामध्ये पक्षापेक्षा कोणीच मोठा नाही हे सिध्द झाले आहे.

हायकमांडच पक्ष कंट्रोल करणार

भाजप पक्ष हा कुण्या व्यक्तिकेंद्रीत असणारा पक्ष नाही. पक्षाच्या विरोधात किंवा पक्ष आदेशाचे पालन करीत नाही त्याचे काय होते याची अनेक उदाहरणे भाजपामध्ये आहे. पक्षाची शिस्त आणि नियम पध्दतीनुसारच सर्वकाही होणार. एखाद्या व्यक्तिमुळे यामध्येय बदल होणार नाही. शिवाय पक्षाचे कंट्रोल कुण्या एकाच्या हाती नाही तर यंत्रणेतील सर्वांच्या विचाराने ठरते तेच मांडले जाते हेच यान निर्णयातून दाखवून देण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशात बदल नाही. त्यामुळेच मंत्रीमंडळाबोहेर राहणार अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदेशानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शपथविधी उरकावा लागला तो ही उपमुख्यमंत्री पदाचा.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंना जे जमलं नाही ते ‘करुन दाखवलं’

सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदी विराजमान होणे हाच शिवसेनेचा उद्देश असल्याचे सातत्याने बोलून दाखवले जात होते. 2019 ला निर्माण राजकीय स्थितीमुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची संधी मिळाली होती पण त्यावेळी स्वत: पक्ष प्रमुख हेच मुख्यमंत्री झाले. आता भाजपाने एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवले आहे. त्यामुळे ठाकरेंना जे जमले नाही ते भाजपाने करुन दाखवले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे अनेकांना न काही सांगता सर्व लक्षात येईल अशी रणनिती पक्षाची राहिली आहे. त्याचा परिणाम सर्वच नेत्यांवर होणार हे नक्की.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.