मुन्नांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये असा सज्जड इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते. महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मैत्रीपोटी चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने मदत करतील असा संभ्रम जिल्ह्यात पसरला आहे. किंबहुना तो पसरवला जात आहे. त्यामुळेच […]

मुन्नांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये : चंद्रकांत पाटील
Follow us on

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये असा सज्जड इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मैत्रीपोटी चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने मदत करतील असा संभ्रम जिल्ह्यात पसरला आहे. किंबहुना तो पसरवला जात आहे. त्यामुळेच  आक्रमक झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी हे उत्तर दिलं.

केंद्रात आणि राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून आमची युती घट्ट झाल्याने, कोणी पंगा घेऊ नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मी ओबडधोबड दिसतो म्हणून मला काही समजत नाही असे समजू नका, जाड भिंगाच्या काचांमधून माझ्या डोळ्यात काय आणि डोक्यात काय चालले, याचा अंदाज कधीच कोणाला येणार नाही, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

कोल्हापूरमधील लढत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. धनंजय महाडिक हे आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशी वैर आहे. मात्र या मतदारसंघात सतेज पाटील यांची निर्णायक भूमिका राहणार आहे. कोल्हापूरमध्ये 23 एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे मतदानापर्यंत कोण कुणाची मतं फोडतं याची चर्चा कोल्हापुरात सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील हाय होल्टेज लढतींमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदार संघात आपलं विशेष लक्ष घातलं आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वादाभोवती ही निवडणूक फिरत आहे. सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना मदत करण्यास नकार दिला आहे.

संबंधित बातम्या 

वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी 

पवारांचं सतेज पाटलांवर कागलमध्ये भाष्य नाही, मात्र हातकणंगलेत जाऊन टीका  

मुन्ना-बंटीमध्ये समेट घडवणं शरद पवारांनाही अशक्य!  

मदत नाही तर नाही, विरोध तर करु नका, धनंजय महाडिक हतबल  

ज्यांच्या मनधरणीसाठी जयंत पाटील कोल्हापुरात, ते सतेज पाटीलच जिल्ह्याबाहेर!  

बंटी-मुन्ना वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही: हसन मुश्रीफ  

VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील