बंटी-मुन्ना वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही: हसन मुश्रीफ

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघ लक्षवेधी ठरत आहे. कारण याठिकाणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या वादाची सगळ्यांनाच कल्पना आहे. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांना मदत करणार नसल्याचं पाटील यांनी अनेकदा सांगितले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दोघांमधील वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही …

, बंटी-मुन्ना वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही: हसन मुश्रीफ

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघ लक्षवेधी ठरत आहे. कारण याठिकाणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या वादाची सगळ्यांनाच कल्पना आहे. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांना मदत करणार नसल्याचं पाटील यांनी अनेकदा सांगितले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दोघांमधील वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही असं स्पष्ट केलं.

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्याठिकाणी मुश्रीफ यांनी हे विधान केलं. हा विषय वरीष्ठ पातळीवरील नेते बघून घेतील असंही मुश्रीफ म्हणाले.

खासदार महाडिक यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचेच असा निर्धार यावेळी करण्यात आला. मुश्रीफ आणि मुन्ना यांचे देखील सूर गेल्या काही दिवसांपर्यंत जुळत नव्हते. मात्र अखेर मुश्रीफ हे महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून, या दोन्ही नेत्यांचे सूत जुळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात समाधान व्यक्त केलं जातंय.

वाचा : …तर सतेज पाटलांची भेट घेईन: मुन्ना महाडिक

शरद पवार यांनी आपली पूर्ण ताकद महाडिक यांच्या बाजूनं उभा केली. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकदिलाने महाडिकांसाठी मैदानात उतरल्याचं चित्र आहे. त्यामुळे ज्या शंका उपस्थित केल्या जात होत्या त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

सतेज पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष 

काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचं हाडवैर राज्याला माहित आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी वैर विसरुन धनंजय महाडिक यांना मदत केली होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना शपथ देत महाडिकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांविरोधात भूमिका घेतली. महाडिकांच्या चुलत भावाने सतेज पाटलांचा पराभव केला आणि दोघांमधला वाद पुन्हा टोकाला गेला.

मुन्ना-बंटी यांचा वाद काय?

डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. हे दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.

याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.

या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.

संबंधित बातम्या

VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील  

महाडिकांचं भाषण मुश्रीफांच्या कार्यर्त्यांनी रोखलं, हात धरुन ओढून पुन्हा भाषणासाठी आणलं   

शिवसेनेसाठी प्रयत्न करु, पण धनंजय महाडिकांवर आमचं प्रेम: चंद्रकांत पाटील 

राष्ट्रवादीला जिंकण्याची आशा असलेल्या 10 मतदारसंघात सद्यस्थिती काय आहे? 

मोर्चा एनडी पाटलांचा, एकत्र मुन्ना-बंटी, एण्ट्री नांगरे पाटलांची 

…तर सतेज पाटलांची भेट घेईन: मुन्ना महाडिक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *