बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यालाच योगायोग म्हणतात : धनंजय मुंडे

| Updated on: Aug 14, 2020 | 3:55 PM

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पार्थ पवार प्रकरणावर भाष्य केलं आहे (Dhananjay Munde on Sharad Pawar Parth Pawar).

बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यालाच योगायोग म्हणतात : धनंजय मुंडे
Follow us on

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (14 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पार्थ पवार प्रकरणावर भाष्य केलं (Dhananjay Munde on Sharad Pawar Parth Pawar). बैठकीनंतर शरद पवार पत्रकारांशी न बोलता निघून गेले. यानंतर पार्थ पवार प्रकरण आणि यशवंत चव्हाण सेंटरला अजित पवार समर्थकांची बैठक हा योगायोग आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना विचारला. यावर पार्थ पवार यांच्याबाबत बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या बैठकीत शरद पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आदिती तटकरे इत्यादींचा सहभाग होता.

धनंजय मुंडे म्हणाले, “आज झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. बैठकीत केवळ सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांगाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अजित पवार देखील नाराज नाहीत.” देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतसिंग प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. यानंतर त्यांना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना हाच योगायोग असल्याचं म्हटलं. यावेळी बोलताना त्यांचा चेहऱ्यावरील हावभाव आणि योगायोग या शब्दावर जोर बरेच संकेत करत होता. यातून धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, पार्थबाबत मी काय बोलणार? : संजय राऊत

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. त्यात भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. यातूनही देवेंद्र फडणवीसांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवारांसोबत दिग्गजांची बैठक, राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग

शरद पवार बोलले पार्थला, शब्द बोचले अजित पवारांना, आता पार्थ अन्य सदस्यांशी चर्चा करणार?

देवेंद्र फडणवीस यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्व लवकरच घोषणा करण्याची चिन्हं

संबंधित व्हिडीओ :


Dhananjay Munde on Sharad Pawar Parth Pawar