AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार बोलले पार्थला, शब्द बोचले अजित पवारांना, आता पार्थ अन्य सदस्यांशी चर्चा करणार?

पार्थ पवार यांची नाराज अजूनही कायम असल्याचं दिसतंय. पार्थ पवार अन्य सदस्यांशी चर्चा करणार आहेत. (Parth Pawar to meet other members of Pawar family)

शरद पवार बोलले पार्थला, शब्द बोचले अजित पवारांना, आता पार्थ अन्य सदस्यांशी चर्चा करणार?
| Updated on: Aug 14, 2020 | 11:30 AM
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची नाराज अजूनही कायम असल्याचं दिसतंय. कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्थ पवार आता कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पार्थ प्रकरणात पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे. (Parth Pawar to meet other members of Pawar family)

पार्थ पवार यांनी काल सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांशीही पार्थ चर्चा करणार आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांसमवेत चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. पार्थ यांची काल शरद पवार यांच्याशी भेट झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर  केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.

पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पवार कुटुंबात वाद उद्भवल्याची चर्चा होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थिची भूमिका घेत पार्थ पवारांना थेट शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बोलावून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

अजित पवारही नाराज?

दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हटल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. कॅबिनेट बैठकीतूनही ते लवकर निघाले होते. त्यानंतर पवार कुटुंबियांची सिल्व्हर ओक इथे बैठक झाली होती. आजोबांनी नातवाला सुनावलं तरी त्यात गैर काय अशी सारवा सारव राष्ट्रवादीचे नेते करत असले, तरी एक पिता म्हणून अजित पवारांना शरद पवारांचे पार्थला बोललेले शब्द लागल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

(Parth Pawar to meet other members of Pawar family)

संबंधित बातम्या  

Parth Pawar | पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून? 

Pawar vs Pawar | वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना 

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.