Pawar vs Pawar | वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना

शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी मतमतांतरे नवीन नाहीत. याआधीही पवार कुटुंबातील दोन पिढ्यांमध्ये कधी उघड तर कधी छुपा संघर्ष पाहायला मिळाला आहे.

Pawar vs Pawar | वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना
Follow us
| Updated on: Aug 13, 2020 | 5:56 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना ‘इमॅच्युअर’ म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पार्थचे वडील- उपमुख्यमंत्री अजित पवार, आत्या- खासदार सुप्रिया सुळे, चुलत भाऊ- आमदार रोहित पवार किंवा खुद्द पार्थ असे पवार कुटुंबातील कोणीच याबाबत 24 तासात प्रतिक्रिया दिली नाही. मात्र महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारी एक शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडण्यासारखा मोठा निर्णय घेण्याची बोलून दाखवली जात आहे. (Four Times When Sharad Pawar Vs Ajit Pawar Dispute came forward)

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल चर्चा झाल्याचे संकेत आहेत. आजोबांविरोधात बंड पुकारत नातू वेगळा निर्णय घेणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

एकीकडे, राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जात असल्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राम मंदिर ते सीबीआय चौकशी अशा भूमिका मांडणाऱ्या पार्थ पवारांनी भाजपची वाट चोखंदळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

“पार्थ पवार यांनी याआधी घेतलेल्या भूमिकांमागेही अजित पवार यांचे डोके आहे, असे वाटते. त्यांचे नाव ‘पार्थ’ असले तरी त्यांचे पितामह अजित पवार आहेत, त्यामुळे पार्थ यांच्या खांद्यावरुन अजित पवार निशाणा साधत आहेत” असे मत राजकीय विश्लेषक संजय भोकरे मांडले आहे. “पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता. पण त्यालादेखील शरद पवार यांनी विरोध केला. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, ही भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यावरुन वादंग निर्माण झाला, असेही भोकरे यांनी सांगितले.

“पार्थ पवार यांनी कुठलीही निवडणूक अद्याप जिंकलेली नाही. त्यामुळे त्यांना म्हणावा तसा बेस नाही, म्हणून पक्ष सोडण्यासारखा मोठा निर्णय ते घेतील असे वाटत नाही” असे मत ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी व्यक्त केले.

“सुप्रिया सुळे महाराष्ट्रात येण्यास इच्छुक नाहीत. त्या दिल्लीच्या राजकारणात खुश आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी दुसरे नातू रोहित पवार यांना महाराष्ट्रात राजकीय वारसदार ठरवले आहे. त्यातून अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यात खदखद असणार” असे मत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी मांडले. “पवार घराण्यात सगळे ठीक दिसत नाही. आम्ही एक आहोत, हे तेव्हाच म्हणतात जेव्हा काहीतरी धुसफूस असते” असेही वानखेडे म्हणाले.

“सध्या कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे जाहीर अपमान झाला या भावनेतून नाराज झाल्यास पार्थ पवार फार तर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतील. मात्र वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वाटत नाही. तसे अजित पवारही या सरकारमध्ये फारसे खुश नाहीत” असं मत ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनी मांडले.

पवार विरुद्ध पवार

शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी मतमतांतरे नवीन नाहीत. याआधीही पवार कुटुंबातील दोन पिढ्यांमध्ये कधी उघड तर कधी छुपा संघर्ष पाहायला मिळाला आहे.

लोकसभा निवडणूक :

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र त्याच वेळी पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिले तर चुकीचा संदेश जाईल आणि कार्यकर्ते नाराज होतील, असे मत पवारांनी त्यावेळी व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवणे निश्चित झाले होते. त्यामुळे नातवाच्या हट्टापायी पवार आजोबांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु पार्थ यांच्या पदरी यश पडले नाही.

वेगळा झेंडा :

राष्ट्रवादीने पक्षाच्या झेड्यांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फडकावण्याचा आदेश अजित पवारांनी दिला होता. मात्र राष्ट्रवादीच्या सभा किंवा रॅलींमध्ये भगवा झेंडा वापरण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसून तो अजित पवार यांचा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शरद पवारांची ईडी चौकशी आणि अजित पवारांच्या आमदारकीचा राजीनामा :

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये शरद पवार हे स्वत:हून ईडी कार्यालयात जाणार होते. त्याचवेळी अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी औपचारिकता म्हणून राजीनामा दिल्याने चर्चा रंगली. शरद पवारांवर फोकस झाल्याने लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अजितदादांनी राजीनामा दिल्याचीही कुजबूज होती

फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपद

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या वेळी अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सरकार स्थापनेबाबत बोलणी सुरु असल्याने सर्वच चक्रावले. मात्र पवारांनी यामागे आपला हात नसल्याचे स्पष्ट केले होते. त्या काळात पवार कुटुंबातील वातावरणही गंभीर होते. अवघ्या तीन दिवसात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीस सरकार अल्पायुषी ठरले.

पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका दोन वेळा घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. (Four Times When Sharad Pawar Vs Ajit Pawar Dispute came forward)

पहिली भूमिका

पार्थ पवार यांनी 27 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे, असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले होते.

दुसरी भूमिका

“आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”

पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.

पार्थ पवार यांचा परिचय

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

संबंधित बातम्या :

पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून?

नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला

पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

(Four Times When Sharad Pawar Vs Ajit Pawar Dispute came forward)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.