पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले आहे (Sharad Pawar criticize Parth Pawar).

पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले आहे (Sharad Pawar criticize Parth Pawar). पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचं सांगितलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

शरद म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र, माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्यालाही काही विरोध असण्याचं कारण नाही.” शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

पार्थ पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली होती.


“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी”.

सीबीआय चौकशी केल्याची माहिती देणाऱ्या आपल्या ट्विटमध्ये पार्थ पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं होतं.

मी मुंबई पोलिसांना 50 वर्षांपासून ओळखतो : शरद पवार

शरद पवार म्हणाले, “मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना 50 वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होतं, पण याची चर्चा ज्या पद्धतीने होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटतं.”

संबंधित बातम्या :

देशभावना समजून घ्या, पार्थ पवारांची थेट गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मोठी मागणी

पार्थ पवार यांचे ‘जय श्री राम!’, अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला पत्रातून शुभेच्छा

पार्थ पवार तरुण, अनुभव कमी; ‘जय श्री राम’च्या भूमिकेवर नवाब मलिक यांची सारवासारव

Sharad Pawar criticize Parth Pawar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *