देशभावना समजून घ्या, पार्थ पवारांची थेट गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मोठी मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करावी, असे ट्वीट पार्थ पवारांनी केले

देशभावना समजून घ्या, पार्थ पवारांची थेट गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मोठी मागणी
अनिश बेंद्रे

|

Jul 27, 2020 | 3:53 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली. (Parth Pawar demands investigation into the death of Actor Sushant Singh Rajput)

“सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले. या ट्वीटमध्ये पार्थ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मेन्शन केले आहे.

कोण आहेत पार्थ पवार?

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. (Parth Pawar demands investigation into the death of Actor Sushant Singh Rajput)

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

प्रख्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर घराणेशाहीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. सुशांतला बॉलिवूडमधील दिग्गजांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरुन केला आहे.

हेही वाचा : करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं जाणार : गृहमंत्री

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत. याआधी प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी यांचीही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी झाली आहे. सुशांतचे कुटुंबीय, कर्मचारी, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, ‘दिल बेचारा’ या सुशांतच्या अखेरच्या सिनेमाची सहनायिका संजना संघी अशा अनेक जणांची चौकशी सुरु आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

(Parth Pawar demands investigation into the death of Actor Sushant Singh Rajput)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें