धुळे महापालिकेवर अखेर भाजपचा झेंडा, अनिल गोटेंच्या पक्षाचा सुपडासाफ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

धुळे : भाजप विरुद्ध भाजप लढाईत कोण जिंकणार याचा निर्णय अखेर लागलाय. भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एक उमेदवार निवडून आलाय. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलंय. याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतमोजणी पार पडली. रविवारी पार पडलेल्या या मतदानात 60 […]

धुळे महापालिकेवर अखेर भाजपचा झेंडा, अनिल गोटेंच्या पक्षाचा सुपडासाफ
Follow us on

धुळे : भाजप विरुद्ध भाजप लढाईत कोण जिंकणार याचा निर्णय अखेर लागलाय. भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एक उमेदवार निवडून आलाय. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलंय. याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतमोजणी पार पडली. रविवारी पार पडलेल्या या मतदानात 60 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या त्यांच्याच पक्षाला दिलेल्या आव्हानामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय बनली होती.

अनिल गोटे यांच्या पक्षाचा धुळ्यात फार प्रभाव दिसून आला नाही. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही सपाटून मार खाल्ला आहे. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर होते. पण नंतर भाजपने मोठी मुसंडी घेत बहुमताचा आकडा गाठला. धुळे महापालिकेत अखेर भाजपने झेंडा फडकवला आहे. या विजयाचं श्रेय मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलं.

LIVE UPDATE

  • अंतिम निकाल : भाजपा 50, काँग्रेस 05, राष्ट्रवादी 09, शिवसेना 02, लोकसंग्राम 01, एमआयएम 02, सपा 02, अपक्ष 02
  • भाजपा 51, काँग्रेस+राष्ट्रवादी 15, शिवसेना 03, लोकसंग्राम 01, एमआयएम 04, सपा 01, इतर 01
  • भाजपा 37, काँग्रेस+राष्ट्रवादी 28, शिवसेना 08, लोकसंग्राम 03, एमआयएम 04, सपा 01, इतर 01
  • धुळ्यात भाजपला 37 जागांवर आघाडी, एमआयएमचे चार उमेदवार विजयी, भाजप बहुमताच्या जवळ
  • भाजपा 37, काँग्रेस+राष्ट्रवादी 28, शिवसेना 08, लोकसंग्राम 03, सपा 01, इतर 01
  • भाजपा 31, काँग्रेस+राष्ट्रवादी 28, शिवसेना 08, लोकसंग्राम 03, सपा 01, इतर 01
  • भाजपा 22, काँग्रेस+राष्ट्रवादी 14, शिवसेना 03, लोकसंग्राम 03, सपा 01, इतर 01
  • भाजपा 22, काँग्रेस+राष्ट्रवादी 14, शिवसेना 02, लोकसंग्राम 02, सपा 01, इतर 01
  • धुळे : प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये लोकसंग्रामच्या हेमा गोटे आघाडीवर
  • धुळे – प्रभाग 8 मध्ये चारही जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर
  • भाजपा 20, काँग्रेस+राष्ट्रवादी 13, शिवसेना 02, लोकसंग्राम 02, सपा 01, इतर 01
  • भाजपा 20, काँग्रेस+राष्ट्रवादी 13, शिवसेना 00, लोकसंग्राम 02, सपा 01, इतर 00
  • भाजपा 04, काँग्रेस+राष्ट्रवादी 03, शिवसेना 00, लोकसंग्राम 02, सपा 01, इतर 00
  • धुळ्यात पहिले कल भाजपच्या बाजूने, दोन जागांवर आघाडी
  • भाजपा (2), कॉंग्रेस (00), शिवसेना (00), राष्ट्रवादी (00), लोकसंग्राम (00), मनसे (00), इतर (00)
नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं

भाजपमधील अंतर्गत कलह

या निवडणुकी दरम्यान भाजप महिला उमेदवाराच्या विनयभंगाची तक्रार दाखल झाली. तर, मतदानाच्या आदल्या दिवशी अज्ञात व्यक्तींकडून आमदार अनिल गोटे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या मतदानात हा मुद्दा खूप गाजला. या घटनेनंतर आमदार गोटे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास गोटे यांनी महाराणा चौकातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

“माझ्यावरील हल्ला हा भाजपच्या लोकांनीच केला”, असा दावा गोटे यांनी केला. या हल्ल्यासाठी डॉ. भामरे, गिरीश महाजन, जयकुमार रावळ हे जबादार आहे असे देखील त्यांनी म्हटले.

“लोकसंग्रामच्या गुंडांनी धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली, त्यामुळे गुंड कोण, हे धुळेकरांनीच ठरवावे, आमदार उगाच आदळआपट करत आहेत”, अशी टीका केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी केली.

पैसे वाटप प्रकरण

धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या आचारसंहिता पथकाने शहरातील समता नगर भागातून पैसे वाटत असल्याच्या संशयातून काही तरुणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यातील फक्त एक जण पथकाच्या ताब्यात सापडला. पथकाने त्याच्याकडून 50 हजार रुपये रोख आणि मतदार याद्या, मतदारांची नावे लिहिलेली वही असे सामान जप्त केले होते.

निवडणूक शांततेत पार पडावी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय दंडाधिकारी गणेश मिसाळ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) मनाई आदेश लागू केला होता.

धुळ्यात कुठल्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?

  • काँग्रेस – 22
  • राष्ट्रवादी -45
  • भाजपा -62
  • शिवसेना – 48
  • MIM -12
  • समाजवादी -10
  • लोकसंग्राम -2+60
  • मनसे -1
  • बसपा – 9
  • भारिप बहुजन महासंघ – 5