Amruta Fadnavis : चर्चा अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची! नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाला हादरे बसले. समोर काय होणार काहीही सांगण कठीण होतं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं, एक था कपटी राजा. हा एक मोठा राजकीय मेसेज होता. परंतु, त्यानंतर त्यांनी तो ट्वीट डिलीट केला.

Amruta Fadnavis : चर्चा अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची! नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा
अमृता फडणवीस
| Updated on: Jul 01, 2022 | 11:09 PM

नागपूर : 26 नोव्हेंबर 2019 ला अजित पवार यांच्यासोबत मिळून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची (CM) शपथ घेतली. परंतु, त्यावेळी त्यांच्याकडं बहुमत नव्हता. त्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर (Twitter) आपलं मत व्यक्त केलं होतं.
पलट के आउंगी, खाशो पे खुशबूए लेकर
खिजा की जद में हूँ, मौसम जरा बदलने दे
या ट्वीटला अडीच वर्षे झालीत. गुरुवारी देवेंद्र फडणवीस सत्तेत परत आलेत. तेव्हा पुन्हा अमृत फडणवीस यांनी ट्वीट केला. तो असा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री (Deputy CM) देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.

राजकीय ट्वीट

गेल्या अडीच वर्षात अमृता फडणवीस यांनी काही अॅक्टिव्हीटीज केल्या. त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व समोर आलंय.22 जून  2022 ला एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाला हादरे बसले. समोर काय होणार काहीही सांगण कठीण होतं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं, एक था कपटी राजा. हा एक मोठा राजकीय मेसेज होता. परंतु, त्यानंतर त्यांनी तो ट्वीट डिलीट केला.

प्रियंका चतुर्वेदींसोबत वाद

24 एप्रिल 2022 रोजी अमृता फडणवीस यांनी लिहिलं, बाला साहेब के नाम पे करते सभी अब रास लीला हैं, मैं करू तो साला, कॅरेक्टर ढीला हैं. 5 फेब्रुवारी 2022 ला अमृता फडणवीस यांनी शिवसेनेची प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी वाद घातला होता. अमृता म्हणाल्या होत्या, वाहतूक समस्येमुळं मुंबईत 3 टक्के घटस्फोट होतात. यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी बेस्ट कुतर्कचा अवॉर्ड देण्यासंदर्भात टीका करण्यात आली होती.