दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात जाणार? शिवसेना दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा आमनेसामने

| Updated on: Sep 04, 2022 | 10:59 AM

दुसरीकडे महापालिकेनं जर परवानगी नाकारली, तर दसरा मेळावा घेण्याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटलंय. याआधी शिवाजी पार्कला सायलन्स झोन जाहीर केल्यानंतरही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर सवाल उपस्थित झाले होते.

दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात जाणार? शिवसेना दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा आमनेसामने
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची, हा वाद एकीकडे कोर्टात प्रलंबित आहे. अशातच दुसरीकडे आता दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melawa) घेण्याचा मुद्दाही कमालीचा चर्चेत आलाय. शिवसेना पक्षप्रमुखांनी दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली आहे. दरवर्षी शिवाजी पार्क (Shivaji Park Ground) मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत असतो. कोरोनामुळे या दसरा मेळाव्यात खंड पडला असला, तरी यावर्षी सगळ्यांच गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यात. त्यामुळे यंदाचा शिवसेना दसरा मेळावा अधिक महत्त्वाचा आहे. शिवाय, राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याच्या इराद्यात दिसले नाही, तरच नवल. अशातच उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे गटाने पुन्हा आव्हान दिलंय. दसरा मेळावा घेण्याचा इरादा शिंदे गटाकडूनही बोलून दाखवण्यात आलाय. त्यामुळे परवानगी मिळाली नाही, तर आता दसरा मेळाव्याचा वादही कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

एकीकडे महापालिका परवानगी आपल्यालाच देईल, अशा विश्वास शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलाय. तर दुसरीकडे परवानगी नाही मिळाली, तर कोर्टातही याबाबत दाद मागितली जाऊ शकते, असंही बोललं जातंय. अशावेळी नेमका दसरा मेळाव्यासाठीची परवानगी नेमकी कुणाला मिळते, याकडे महाराष्ट्राचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

हे सुद्धा वाचा

महापालिका कुणाला परवानगी देणार?

उद्धव ठाकरे यांच्या वतीने परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज देण्यात आला आहे. पण त्यावर निर्णय काय घ्यायचा, यावरुन संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातंय. मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत. त्यामुळे एका अर्थाने पालिकेवर सध्या शिंदे-फडणवीस सरकारचंच राज्य असल्यासारखं आहे. याअर्थी शिंदे गटाला परवानगी मिळेल, अशी चर्चा आहे. पण अद्याप तसा कोणताही निर्णय झालेला नाही. शनिवारी अजित पवार यांनीहीह याबाबत बोलताना सूचक विधान केलं होतं. सत्ता ज्यांच्याकडे असते, त्यांना परवानगी मिळवणं फार कठीण होत नाही, अशा आशयाचं विधान अजित पवार यांनीहीह केलं होतं.

दुसरीकडे महापालिकेनं जर परवानगी नाकारली, तर दसरा मेळावा घेण्याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटलंय. याआधी शिवाजी पार्कला सायलन्स झोन जाहीर केल्यानंतरही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर सवाल उपस्थित झाले होते. पण हा एक पारंपरीक उत्सव असल्याचं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावा परवानगी देण्यात आलेली. आता यावेळी नेमकं काय होतं, याची उत्सुकता ताणली गेलीय.