मोठी बातमी! आता भारतातील गरीबातील गरीब व्यक्तीलाही घेता येणार कार, किमती होणार प्रचंड कमी, जाणून घ्या कोणती कार कितीला?
मोठी बातमी समोर येत आहे, लवकरच भारत आणि युरोपियन संघमध्ये मोठा व्यापारी करार होणार आहे, या एफटीआयनंतर भारतामध्ये कार प्रचंड स्वस्त होणार आहेत, सामान्य लोकांना देखील कार सहज खरेदी करता येणार आहेत.

भारत आणि युरोपियन संघ (EU) मध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंट FTA होणार आहे. भारत आणि युरोपियन संघामध्ये होणारा हा मुक्त व्यापारी करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हा करार झाल्यानंतर भारतामध्ये कार प्रचंड स्वस्त होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार भारताने युरोपियन युनियनमधील देशांना एक मोठी ऑफर दिली आहे, ती म्हणजे युरोपमधून भारतात येणाऱ्या कारवरील टॅरिफ भारत मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे. भारतानं दिलेल्या या ऑफरमुळे आता युरोपीयन संघ आणि भारतामधील मुक्त व्यापार करार लवकच होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या करारावर चर्चा सुरू आहे. मात्र आता आनंदाची बातमी म्हणजे लवकरच या करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या डीलमध्ये काय आहे खास?
युरोपमधून येणाऱ्या कारवर सध्या परिस्थितीमध्ये भारतात तब्बल 110 टक्के टॅरिफ आहे, मात्र भारताकडून युरोपियन युनियनला ऑफर देण्यात आली आहे, मुक्त व्यापार करार अस्तित्वा आल्यानंतर भारत युरोपमधून येणार्या सर्व प्रकारच्या कारवरील टॅरिफ कमी करून तो 40 टक्के इतका करणार आहे, तर काही कंपन्यांच्या कारला याही टॅरिफमध्ये विशेष सूट मिळून टॅरिफ 10 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. म्हणजे आता युरोपमधून येणाऱ्या कारवर 110 टक्के टॅरिफ ऐवजी अवघा दहा टक्के टॅरिफ लावला जाणार आहे, त्यामुळे भारतात आता युरोपमधून येणाऱ्या मर्सिडीज, फॉक्सव्हॅगन आणि ऑडी सारख्या कार खूप स्वस्त होणार आहेत. भारतात सध्या या कारवर प्रचंड टॅरिफ असल्यामुळे त्या महाग आहेत, मात्र ही डील होताच या कार खूप स्वस्त होणार आहेत.
भारताचा काय फायदा होणार?
युरोपियन यूनियनमध्ये तब्बल 27 देश आहेत, त्यामुळे भारताची निर्यात प्रचंड वाढणार आहेत, भारतामध्ये निर्माण होणाऱ्या कपडे, जेम्स ज्वेलरी, अभियांत्रिकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, यासह इतर अनेक वस्तूंना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, एवढंच नाही तर युरोपियन देशात भारतीय वस्तुंवर लावण्यात येणारा टॅरिफ देखील कमी होणार आहे, ही एवढी मोठी डील आहे की, या डीलला मदर्स ऑफ ऑल डील असं म्हटलं गेलं आहे.
