AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून वेस्ट इंडिजच्या खेळाडूची माघार, झालं असं की…

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला सुरू होण्यापू्र्वीच गळती लागली आहे. या स्पर्धेतून खेळाडूंनी माघार घेण्यास सुरूवात केली आहे. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू गुडाकेश मोतीने पीएसएलमधून नाव मागे घेतलं. कारण की...

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून वेस्ट इंडिजच्या खेळाडूची माघार, झालं असं की...
PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून वेस्ट इंडिजच्या खेळाडूची माघार, झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Mar 13, 2026 | 8:17 PM
Share

पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धा या ना त्या कारणाने कायम चर्चेत असते. या स्पर्धेचं सुमार नियोजन कायम चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे जगभरात या लीग स्पर्धेच्या आयोजनाची खिल्ली उडवली जाते. असं असताना पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धेपूर्वीच धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. कारण या स्पर्धेतून खेळाडूंनी माघार घेण्याची मालिका सुरू झाली आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू गुडाकेश मोती याने पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धेतून नाव मागे घेतलं आहे. आता इतर खेळाडूही त्याच्यासारखं पाऊल उचलण्याची तयारी करत आहेत. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा झाल्यानंतर गुडाकेश मोती भारतातच अडकला होता. अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाचा फटका बसला होता. अनेक फ्लाईट्स रद्द झाल्याने भारताच अडकला होता. पण आता सुखरूप घरी पोहोचला आहे.

गुडाकेश मोतीने या स्पर्धेतून माघार घेण्याचं कारण तसं काही स्पष्ट नाही. रिपोर्टनुसार, गुडाकेशला पाकिस्तानात अडकण्याची भीती सतावत आहे. युद्धाचा विमानसेवेवर परिणाम झाला असून तसं वाटणं सहाजिकच आहे. गुडाकेश मोतीसाठी लाहोर कलंदर्सने 1.10 कोटी पाकिस्तानी रुपये मोजले होते. पण आता त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, मोतीच्या जागी श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेलालगेला संघात घेतलं आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत गुडाकेश मोतीने 7 सामन्यात 173 धावा दिल्या आणि 10 विकेट काढल्या होत्या. त्यामुळे फॉर्मात असलेला गोलंदाज हातून गेल्याने फ्रेंचायझीला मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघार घेणारा गुडाकेश मोती हा काही एकमेव खेळाडू नाही. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी यानेही इस्लामाबाद युनाईटेड संघातून नाव मागे घेतलं आहे. रिपोर्टनुसार, मुजरबानी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळू शकतो. कारण भारत बांग्लादेश वादामुळे मुस्ताफिझुर रहमानला स्पर्धेतून काढलं आहे. त्याची जागा आता ब्लेसिंग मुजरबानी घेणार असल्याचं बोललं जात आहे. ब्लेसिंग मुझरबानी हा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला होता. त्याने 6 सामन्यात 7.89 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट काढल्या.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल