AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Floor Test: गुवाहटी ते गोवा, तिथून मुंबई, बंडखोर आमदार बहुमत चाचणीला कसे पोहोचणार? इनसाईड स्टोरी

30 जून रोजी बहुमत चाचणीसाठी भाजपचे आमदार आणि शिंदेसेनेचे आमदार एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून विधानभवनाकडे रवाना होतील. महाराष्ट्राच्या सत्तानाट्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसासाठी हा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे.

Maharashtra Floor Test: गुवाहटी ते गोवा, तिथून मुंबई, बंडखोर आमदार बहुमत चाचणीला कसे पोहोचणार? इनसाईड स्टोरी
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 29, 2022 | 1:01 PM
Share

मुंबईः मागील आठ दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर ठेवलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदारांना (Rebel MLA) आता बहुमत चाचणीसाठी (Floor test) महाराष्ट्रात आणण्याचं मोठं आव्हान आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आवाहनाला किंवा धमक्यांना बळी न पडलेल्या आमदारांना बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या वतीने एक मेगा प्लॅन आखल्याची विश्वसनीय माहिती TV9 कडे आली आहे. तसेच आज आणि उद्या आसाममध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महाराष्ट्रातही आज पोहोचणार नाहीत आणि आसामही तत्काळ सोडतील, यासाठी विचारपूर्वक नियोजन करण्यात आले आहे. उद्या 30 जून रोजी बहुमत चाचणी होणार आहे. तत्पूर्वी आज बुधवारी संध्याकाळी आमदारांना गुवाहटीवरून गोव्यात आणलं जाईल. तेथून उद्या सकाळी त्यांना मुंबईत आणलं जाईल. त्यानंतर सकाळच्या वेळी आमदार थेट बहुमत चाचणीसाठी पोहोचतील. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत ज्या ठिकाणी हे आमदार थांबणार आहेत, त्याच ठिकाणी भाजपच्या आमदारांनाही बोलावून घेण्यात आलं आहे. म्हणजेच 30 जून रोजी बहुमत चाचणीसाठी भाजपचे आमदार आणि शिंदेसेनेचे आमदार एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून विधानभवनाकडे रवाना होतील. महाराष्ट्राच्या सत्तानाट्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसासाठी हा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे.

गुवाहटीतून थेट मुंबई का नाही?

आसामची राजधानी गुवाहटी येथे सध्या एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार वास्तव्यास आहेत. मात्र मागील काही दिवासंपासून आसाममध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. आज आणि उद्या तर आसाममध्ये अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी गुवाहटीहून थेट मुंबईत विमानाने यायचं असं नियोजन केलं आणि पावसामुळे विमानाचं उड्डाण झालं नाही तर, आमदार बहुमत चाचणीसाठी विधानभवनापर्यत पोहोचू शकणार नाहीत. तसेच आमदारांना शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्याचंही आव्हान आहे. त्यामुळेच शिंदेसेना आणि भाजपच्या वतीने असा मेगाप्लॅन करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

काय आहे मेगा प्लॅन?

  1. आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता गुवाहटीतून एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गोव्याकडे रवाना होतील.
  2.  बुधवारी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान बंडखोर आमदार गोव्यात उतरतील. बुधवारचा गोव्यातील मुक्काम हा ताज हॉटेलमध्ये असेल.
  3. गुरुवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास गोव्याहून सर्व आमदार मुंबईच्या दिशेने विमानाने निघतील.
  4.  गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावरून सर्व आमदार हॉटेल ताज येथे जातील.
  5.  मुंबईतील हॉटेल ताजमध्येच भाजपच्या सर्व आमदारांना बोलावून घेण्यात आलं आहे.
  6.  मुंबईतल्या हॉटेल ताजमध्येच भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार एकत्र नाश्ता करतील.
  7.  बहुमत चाचणी सकाळी 11 वाजता आहे. त्याआधी भाजप आणि शिंदेसेना विधानभनाकडे रवाना होईल..

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...