Maharashtra Politics| परतीचे दोर कापल्यानं शिंदेंसमोर एकच पर्याय, दुपारी राज्यपालांना भेटणार, ठाकरे सरकारकडे अखेरचे काही तास?

| Updated on: Jun 22, 2022 | 8:09 AM

एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra Politics| परतीचे दोर कापल्यानं शिंदेंसमोर एकच पर्याय, दुपारी राज्यपालांना भेटणार, ठाकरे सरकारकडे अखेरचे काही तास?
Follow us on

मुंबईः 40 आमदारा आपल्या बरोबर घेऊन बंडाचा झेंडा उगारलेल्या एकनाथ शिंदेंमुळे (Eknath Shinde) अवघा महाराष्ट्र वेठीस धरला आहे. शिवसेना प्रमुख उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न होऊनदेखील शिंदेंची नाराजी कमी होऊ शकलेली नाही. त्यातच शिवसेनेकडून शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यांचं गटनेते पद रद्द करण्यात आलं. यामुळे एकनाथ शिंदेंसमोर आता एकच पर्याय आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार सध्या आसाममधील गुवाहटीत (Guwahati) आहेत. तेथून दुपारपर्यंत ते मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. या भेटीनंतरच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला शिवसेना आमदारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या घडामोडीनंतरच ठाकरे सरकारकडे आता सत्तेतील किती तास शिल्लक आहेत, हे कळू शकेल.

रात्रीतून काय घडलं?

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे.

हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जायचंय..

एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेना सोडणार नसल्याचं रात्री दिलेल्या प्रतिक्रियेत पुन्हा म्हटलं आहे. मात्र माझ्याकडे जो आमदारांचा गट आहे, तीच खरी शिवसेना आहे, असं ठसवून त्यांनी सांगितलं आहे. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे त्यांची पुढील रणनीती काय आहे, याचे अंदाज लावले जात आहेत.

ठाकरे सरकारचे अखेरचे काही तास?

एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पाठिंब्याने सुरु असलेली ही रणनिती यशस्वी झाली तर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असं म्हणावं लागेल.