Eknath Shinde News LIVE : दिल्लीत मोदी-शाहांची महाराष्ट्राच्या सत्ताबदलाबाबत खलबतं?
Eknath Shinde News Live Maharashtra Government, Political Crisis MVA Crisis Updates : एकनाथ शिंदें सूरतहून आसामच्या गुवाहाटीला, बंडखोरीचा दुसरा दिवस? एकनाथ शिंदेंसोबत कोण कोण? शिवसेना पुढे काय करणार? महाविकास आघाडीचं काय होणार? जाणून घ्या, महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्यात मोठी बातमीचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना बंड केलं. 40 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन त्यांनी बंड केल्यानं महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे तर शिवसेनेही हादरली आहे. शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदारही त्यांनी फोडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. जाणून घेऊयात, महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्यात मोठी बातमीचे लाईव्ह अपडेट्स…
LIVE NEWS & UPDATES
-
दिल्लीत मोदी-शाहांची महाराष्ट्राच्या सत्ताबदलाबाबत खलबतं?
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची अडीच तासांपासून सुरू असलेली बैठक संपली
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता
सरकार स्थापन करताना येणाऱ्या टेक्निकल बाबींवर विचार झाल्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस ही दिल्लीत, या बैठकीत ते ही होते का अशी चर्चा.
-
आसाम सरकारकडून तीन बंडखोर आमदारांना रेड कार्पेट
विशेष लोकांसाठी तयार केलेल्या गेट मधून आमदारांची एक्झिट
गुवाहाटी विमानतळावर आमदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट
तीन आमदारांना आज व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट
पंतप्रधान ,राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शिवाय
व्हीआयपी गेटमधून कुणालाही एक्झिट दिली जात नाही
लष्करी अधिकाऱ्यांसाठीही या गेटचा वापर केला जातो
मात्र महाराष्ट्रातून आलेल्या तीन आमदारांना आज व्हीव्हीआयपी गेटमधून एक्झिट देण्यात आली
आसाम राज्यात या एक्झिटची जोरदार चर्चा
-
-
तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही-एकनाथ शिंदे
कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
-
पुरावे तपासून आमदारकी रद्द करण्याचा निर्णय-विधितज्ज्ञ
पुराव्यांच्या आधारे याबाबत विधानसभा उपाध्यक्ष निर्णय घेतील
पुरावे तपासून, लेखी उत्तरे मागवून, प्रक्रियेतून निर्णय घेतला जाईल
ही अर्ध न्यायिक प्रक्रिया आहे, त्यानंतर सिद्ध झाले तर कारवाई
विधितज्ज्ञ अनंत कळसे यांची माहिती
पक्षात उभी संघटनात्मक फूट पडली तरच नवीन पक्षाला मान्यता मिळू शकेल-कळसे
जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या पातळीवर पक्षात फूट दाखवावी लागेल-कळसे
-
12 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर- शिंदे गट
12 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर
शिवसेनेच्या मागणीवर एकनाथ शिंदे गटाची प्रतिक्रिया
आपली बाजू न मांडता कारवाई केली तर चुकीची -शिंदे गट
याबाबत कायदेशीर लढा देऊ -शिंदे गट
-
शिवसेनेकडे किती आमदार उरलेत?, पराभवाची अपेक्षा करा -राणे
संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
-
नको त्या वयात धमक्या देऊ नका – नारायण राणे
आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
-
एकनाथ शिंदेंसह बारा आमदारांची आमदारकी रद्द करा-शिवसेना
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर 12 आमदारांची आमदारकी रद्द करा अशी मागणी केली आहे.
कोणाच्या आमदारकी रद्द करण्याची मागणी?
एकनाथ शिंदे
तानाजी सावंत
संदीपान भुमरे
संजय शिरसाठ
अब्दुल सत्तार
भरत गोगावले
प्रकाश सुर्वे
अनिल बाबर
बालाजी किनीकर
यामिनी जाधव
लता सोनावणे
महेश शिंदे
-
गुवाहाटीत आणखी तीन शिवसेना आमदार दाखल
गुवाहाटीत आणखी तीन शिवसेना आमदार दाखल
कृषीमंत्री दादा भुसे, माजी वनमंत्री संजय राठोड आणि रवींद्र फाटक पोहोचले
शिवसेनेचे बंडखोर आमदार असलेल्या हॉटेलमध्ये पोहचले
एकनाथ शिंदे गटाची ताकद आणखी वाढली
-
नारायण राणे यांचा ट्विट करत महाविकास आघाडीला इशारा
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
-
शिवसेनेचं शिष्टमंडळ उपाध्यक्षांच्या भेटीला
बातमी शिवसेनेची
-
उद्धव ठाकरेंच्या विभाग प्रमुखांना सुचना
बातमी शिवसेनेच्या गोटातून
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या विभागप्रमुखांना सुचना
- पक्षाचे विभागवार मेळावे घ्या
- प्रत्येक शाखा पिंजून काढा
- हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्यावर काम करत चला
- जे सोडून गेले त्यांचा विचार करु नका
- आणखी ताकद निर्माण करायचीय, लढायचंय
- प्रत्येक कार्यकर्त्यानं पक्ष बांधणीसाठी झोकून द्यावं लागेल
-
राष्ट्रवादीची बैठक संपली, शरद पवारांची पत्रकार परिषद
सरकारच्या संकटावर शरद पवार म्हणतात
सरकारनं उत्तम निर्णय घेतले
अडीच वर्षात आरोग्य खात्यानं उत्तम काम केलं
हा प्रयोग फसला असं म्हणनं राजकीय अज्ञान
ते इथं आल्यानंतर मला खात्रीय, वस्तुस्थिती समोर येईल
उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा
विश्वासदर्शक ठरावावेळीच कळेल की हे सरकार बहुमतात आहे
माध्यमात येत असलेल्या गोष्टी नाकारणं चुकीचं
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे सरकार चालू आहे हे देशाला कळेल
जे उद्धव ठाकरेंनी सांगितलं तेच संजय राऊतांनी सांगितलं
इथं येऊन जे काही करायचं ते सांगा, पवारांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर तक्रार नाही
आमदार इथं परत आले की वस्तुस्थिती समजेल
अजित पवारांना गुजरात आणि आसाममधली माहिती कमी
तिथली माहिती आम्हा लोकांना जास्त आहे
शिंदेंनी एक वक्तव्य केलंय, आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे.
माझ्याकडे पक्षाची यादी आहे, पवारांनी ही यादी वाचून दाखवली
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचाच हात असल्याचा थेट आरोप
सुरत, आसामला व्यवस्था करणारे लोक अजित पवारांच्या ओळखीचे नाहीत
माझ्या परिचयाचे आहेत
इथं कुणी दिसत नाही पण तिथं कोण आहे ते तुम्हाला दिसेल
निधी फक्त राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळत होता, तो असत्य
पक्षांतर बंदी कायद्याचा परिणाम भोगावे लागतील तसच
मतदारसंघातही परिणाम भोगावे लागतील, पवारांचं बंडखोरांना इशारा
जे आसाममध्ये गेले त्यांचा पराभव होईल, पवारांनी भुजबळांच्या बंडाचा संदर्भ दिला
-
एकनाथ शिंदे यांची भाजपसोबत जाण्याची भूमिका जाहीर
आमचा जो निर्णय घ्यायचा आहे, याचे सर्व अधिकार आम्ही एकमताने एकनाथजी भाऊ शिंदे यांना देत आहोत. हात वर करा सगळ्यांनी, तुम्ही स्वीकारा नेतृत्व आमचं, असे आवाहन सुरूवातील आमदार करत आहेत. तर एकनाथ शिंदे म्हणतात, जे काही सुख दुख आहे ते आपलं सगळ्यांचं एक आहे.काहीही असेल तर आपण एकजुटीने किती काहीही होऊद्या विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणालात नॅशनल पार्टी आहे. ती महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, काय परिस्थिही होती माहिती नाही. त्यांनी मला सांगितलं आहे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे…एवढाच व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
पाहा हाच व्हिडिओ
-
बंडामागे भाजपचा हात नाही-अजित पवार, जयंत पाटील यांचं वक्तव्य
आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतरही आम्ही सरकार टिकवण्यावर ठाम आहोत. आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले आहेत. मात्र या बंडात भाजपचा हात नसल्याचे भाष्य आधी अजित पवारांनी केलं. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. अजून या घडामोडीत भाजपचे कोणतेही मोठे नेते दिसले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ही अंतर्गत नाराजी वाटत आहे, असेच ते म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांनीही हाच सूर धरल्याचे दिसून आले. त्याही यामागे भाजपचा हात असल्याचे नाकारले आहे.
-
मंत्री जयंत पाटील Live
त्यांनी कुठे राहून कामकाज पाहायचं हा त्यांचा प्रश्न आहे
त्यावरून आम्ही नाराज असण्याचे काही कारण नाही
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत दावा केला आहे
मुंबईत येऊन दावा केल्यावर बघूच
आमचं बहूमत आहेच, ते फक्त रसून तिकडे गेले आहेत
त्यांचा रुसवा गेला की सर्व ठीक होईल
भाजपचा हात नसल्याचं सध्या तरी दिसत नाही
भाजपचे प्रमुख नेते तर सध्या यामध्ये अजून दिसन नाहीत
फडणवीस त्यांचं सरकार केंंद्रात असल्याने गेले असतील
ज्यावेळी दिसेल त्या दिवशी आम्ही बोलू
विमानांची व्यवस्था, हॉटेल व्यवस्था कुणी केली हे तुम्हीच सांगा मग आम्ही भाजपवर बोलू
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
आत्ता तरी या बंडात कुठला मोठा भाजप नेते दिसत नाही
मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी याबाबत विचार केला असेल
एवढं टोका पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नये
त्यांना बळजबरीने नेले हाही संसोधनाचा विषय आहे
शिवसेनेत ज्यावेळी बंड झाले तेव्हा शिवसैनिक नेत्यांमागे गेले नाहीत
बंड करणारी एक व्यक्ती टिकते पण बाकीचे सहकारी निवडूनही येत नाही
त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात
हे बंड होताना गृहमंत्रालयाला माहिती असणे आवश्यक होते
हे तर त्यांचं कामच आहे
पाहा व्हिडिओ
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
आमचं सरकार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सेक्युलर पक्ष आहे. शिवसेना तुम्हाला माहीत आहे. जे विषय आपल्या राज्याच्या विकासाचे असतील ते पुढे न्यायचं ठरलं आणि आम्ही अडीच वर्ष केलं आहे. त्यांना जे काही वाटत होतं ते त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरून सांगितलं.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे
राऊतांनी असं वक्तव्य का केलं हे मला माहिती नाही
मात्र यावर आम्ही टीका करण्याचं काम नाही
काय बोलावं हा त्यांचा आरोप आहे
मी उद्धव ठाकरेंना विचारेन अशी प्रतिक्रिया आली आहे, उद्धव ठाकरेंना मी याबाबत थेट विचारेन तुमच्या मनात काय आहे का
मात्र मला नाही वाटत असे काही असेल
हे आमदारांना परत बोलवण्यासाठीही असू शकतं
या परिस्थितीतून मार्ग काढण्यावर भर दिला पाहिजे
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
आमदारांनी असे वक्तव्य का केले माहिती नाही
मात्र सर्वांना समान निधी देण्याची भूमिका ही माझी असते
सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
आमदारांच्यात काही प्रश्न निर्माण झाले आहेत
त्यांचे अधिकृत लोक याबाबत बोलतील
काही आमदार परत आले आहेत
तिकडे जे आमदार आहेत तेही आपल्याला पाहायला मिळत आहे
आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे
आमची भूमिका ही आघाडी टिकवण्याची आहे
आमच्यातले मित्र पत्र काही वेगळी प्रतिक्रिया देत आहेत
निधीवरून माझ्यावर आरोप केले जात आहेत
आपण पालकमंत्री नेमताना आणि निधी देताना कुठेही काटछाट केली नाही
पाहा व्हिडिओ
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
-
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण Live
-
कुणाचे आरोप खरे कुणाचे आरोप खोटे?
-
काँग्रेसची मुंबईत बैठक, नवी भूमिका जाहीर
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात
-
मोठी बातमी भाजपच्या गोटातून
आता बातमीचं केंद्र दिल्ली
भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
सध्याच्या राजकीय घडामोडींवर फडणवीसांच्या दिल्ली वारीला विशेष महत्व
-
थेट काँग्रेसच्या बैठकीतून विशेष माहिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात
महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष चालेल
काँग्रेस महाविकास आघाडीत आहे आणि राहणार यात दुमत नाही
भाजपा समोर का येत नाही
आकडे अजूनही उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या बाजूनं आहेत
राऊतांचं वक्तव्य हे रणनितीच्या आधारावर
आमचं सरकार अल्पमतात तर भाजपनं अविश्वास दर्शक ठराव आणावा
ह्या महाभारताच्या मुळाशी भाजपच
अस्थिरता अशीच कायम राहिली तर लोकांचं नुकसान
राऊतांचं वक्तव्य हे त्यांच्या पार्टीसाठी, आघाडीसाठी नाही
-
काँग्रेसची बैठक संपली
काँग्रेस बैठक संपली, अशोक चव्हाण म्हणतात
-
उद्या शिंदे गट राज्यपालांना पत्र पाठवणार
शिंदे गटाचा चाळीसपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा
राज्यात उद्या मोठा राजकीय भूकंप होणार?
-
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही
-
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार Live
-
संजय राऊतांचं पुन्हा एक ट्विट
चर्चेतून मार्ग निघू शकतो.
चर्चा होऊ शकते.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2022
देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली
-
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार-संजय राऊत
-
– एकनाथ शिंदे गट उद्या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार
– आमच्या कडे 42 चं संख्याबळ असल्याचं पत्र पाठवणार
– आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या सऱ्ह्या घेऊन पत्र पाठवणार
-
रवींद्र फाटकही गुवाहाटीला पोहोचणार
संजय राठोड आणि दादा भुसे यांच्यासोबत रवींद्र फाटकही गुवाहाटीला जाणार आहेत, अशी ताजी माहिती आत्ताच समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना सजावायला सुरतला गेले होते.
-
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचीही एकनाथ शिंदेंना साथ
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचीही एकनाथ शिंदेंना साथ मिळत आहे. नरेश म्हस्के यांनी आत्ताच एक पोस्ट केली आहे. जी सध्या जास्त चर्चेत आहे.
म्हस्के यांची पोस्ट
-
काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात
-
सुभाष देसाई यांची पोस्ट चर्चेत
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही.
देसाई यांची पोस्ट
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही.
— Subhash Desai (@Subhash_Desai) June 23, 2022
-
महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे मंत्र्यांची धावपळ
-
गद्दारांना जागा दाखवून पुन्हा भगवा फडकवू-विनायक राऊत
-
मंत्री छगन भुजबळ Live
मीही असे ऐकले की संजय राऊतांनी आवाहन केलं की तुम्ही या आम्ही बाहेर पडयाला तयार आहे. कोणताही पक्ष बाहेर पडायचं म्हणत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. मात्र त्यांनी विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे. यातला संभ्रम त्यांनी दूर केला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आपली नारजी स्पष्ट केली आहे.
आम्ही भाजपसोबत जावं अशी आमच्या आमदारांची मागणी नाही. आमचे सर्व कार्यकर्ते हे ठाम आहेत. जर कुणाला वेगळ्या रस्त्याने जायचं असेल तर कारणं शोधली जातात. मात्र हे सत्य नाही, असे म्हणत भुजबळांनी यावेळी नाना पटोले यांनाही प्रत्युत्तर दिले आहे.
-
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार Live
कालपासून सर्व राजकीय घडामोडी सुरू झाल्या
सर्व अपक्ष आमदारांना सोबत घेण्याच्या सूचना
सोबतच्या आमदारांचे मला फोन आले
मात्र महाविकास आघाडीसोबत असल्याचे सांगितले
दोन दिवसात चित्र बदललेले असेल
ही पडद्याआडून भाजपचं षडयंत्र आहे
काही अंशी यात ईडीचा आणि भाजपच्या प्रमुखांचा वाटा आहे
मलाही त्यांनी मंत्रिपदाच्या ऑफर दिल्या
काँग्रेस नेत्यांचीही बैठक
-
शिवसेना नेते तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया
कैलास पाटील यांची परत येण्याची आम्हीच व्यवस्था केली. कैलास पाटील हे मीडियाची दिशाभूल करत आहेत. त्यांना कोणताही त्रास दिला गेला नाही. ही पक्षप्रमुखांचीही दिशाभूल आहे. गेली अडीच वर्षे त्यांनी पक्षप्रमुख आणि माझीही दिशाभूल केली आहे. या गुवाहाटीला आलेला प्रत्येक आमदार हा स्वखुशीने आला आहे. कुणालाही एकनाथ शिंदे यांनी फोन केला नाही.
शिवसैनिक आजींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
-
संजय राठोड आणि दादा भुसे गुवाहाटीसाठी रवाना
-
गुवाहाटीतले दोन आमदार हॉटेलच्या बाहेर पडले
-
यवतमाळ- पोहरादेवीच्या महंतांनी संजय राठोड यांना दिल्या सूचना
-
राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील Live
जे गुवाहाटीला गेले आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढून घेतला नाही
त्यांनी पक्ष सोडण्याचीही भाषा केली नाही
ते मुंबईला परत आले आणि चर्चा झाली तर पुढचं ठरेल
संजय राऊत यांनी केलं विधान अंतर्गत चर्चा करून केलं असेल, त्यामुळे बघू काय होईल
शिवसेनेचा इतिहास आसा आहे की ज्यांनी पक्ष सोडला ते निवडणुकीत हरले
कार्यकर्ते हे पक्षाचे असतात ते नेत्यांना खूप साथ देत नाही
ते बहुमत टिकवण्यासाठी काहीतरी निर्णय घेतील
वर्षा सोडून मातोश्रीवर जाणं हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे
मात्र आजही ते मुख्यमंत्री आहेतच
सध्याच्या परिस्थिती अवगत करण्यासाठी आजची बैठक आहे
आमची विरोधी पक्षात बसायची तयारी-नाना पटोले
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Live
सध्या आम्ही महाविकास आघाडीसोबत आहे
शिवसेना जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य आहे
-
देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली
-
शरद पवार यांची भूमिका स्पष्ट
-
थोड्या वेळात सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेसची बैठक
-
संजय राठोड यांच्या घरात तणाव
संजय राठोड यांच्या पत्नी शितल राठोड यांना बीपीचा त्रास सुरु झाल्याने जेजे रुग्णालयात भरती
गेले काही दिवस संजय राठोड हे घरुन नॉट रिचेबल होते त्यानंतर वर्षावर एकनाथ शिंदेचा प्रस्ताव घेवून संजय राठोड गेल्याने शितल राठोड यांना धक्का बसला
काल दिवसभर संजय राठोड जेजे रुग्णालयात होते आज ते गुवाहाटीसाठी निघाले
संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड यांची इच्छा होती
रुग्णलयातले फोटोही समोर
-
गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपात केला प्रवेश
-
हेच सरकार कायम राहवं हीच आमची इच्छा-प्रफुल्ल पटेल
-
काँग्रेस नेत्यांचीही आज महत्वपूर्ण बैठक
-
शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीची बैठक
-
मुंबईचे पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
-
शिंदे गटाचे 41 आमदार गुवाहाटीत
-
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
राज्यातील परिस्थीतीवर आमची राजकीय भूमिका काय आसणार यावर बैठकीत चर्चा आम्ही करणार आहोत
हे सरकार कायम राहावे आशी आमची इच्छा आहे
मुख्यमंत्री महोदय कोणत्या बंगल्यात राहीले हा विषय महत्वाचा नाही
परिस्थीती वेगळी निर्माण झाली आहे
काही लोक म्हणतात जबरदस्ती ठेवले आहे
एख दोन दिवसात सगळे स्पष्ट होईल नेमके कोण कोणासोबत आहेत
आजून त्यांनी काही भूमिका स्पष्ट केली नाही
शिंदे गटाची भूमिका काय? पाहा व्हिडिओ
-
शिंदे गटाच्या आमदारांचा नवा दावा
नितीन देशमुख हे पळून आले नाहीत तर त्यांना विमानाने आम्हीच पाठवलं, असा दावा आता शिंदे गटाकडून करण्यात आलाय. तसेच त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर टाकले आहेत.
नितीन देशमुखांचे फोटो पोस्ट
-
राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज
-
भाजपच्या गोटातही हलचाली वाढल्या
एकिकडे संजय राऊत हे आमदाना परत येण्याचं आवाहन करत असतानाच दुसरीकडे भाजप नेत्यांच्या भेटीगाठी या वाढल्या आहेत. आज किरीट सोमय्या आणि गिरीश महाजन यांंनी देवेंद्र फडणवीसांठी भेट घेतलीय.
भेटीचा फोटो चर्चेत
-
बंडखोर आमदारांची भूमिकाही समोर
एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल
बंडखोर आमदारांची नवी भूमिका समोर
एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रतिसाद देणार?
मुख्यमंत्री ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आमदार परत येणार नाहीत-सुत्रांची माहिती
मुख्यमंत्र्यांनी आधी राजीनामा देऊन बाहेर पडावं ही आमदारांची मागणी आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे
-
शिवसेना खासदार संजय राऊत LIVE
तुम्ही आमदारांची काहणी पाहिली आहे
कायदेशीर युद्धही चालणार
महाविकास आघाडीतून बाहेर जायचं सांगणं हा बाहणा आहे
लोकाना धमाकवून, ईडी, सीबीआयचे भिती दाखवून आम्ही घाबरणार नाही
ज्यादा तर ज्यात काय होईल, सत्ता जाईल, पुन्हा सत्ता येईल
येऊद्या, समोर येऊन बसुद्या बोलूद्या
पार्टीत आम्ही चर्चा करू आम्ही निर्णय घेऊ
बंडखोरांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं-राऊत
-
प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया
– शरद पवारांनी आज 5 वाजता बैठकीसाठी बोलवलं आहे,
– शरद पवार जे सांगतील ते आम्ही करणार,
– आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहोत,
– मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यामुळे नाराजी नाही
-
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव मान्य करायचा की नाही हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न
काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला होता विरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी आहे
काँग्रेसचे सर्व आमदार काँग्रेस सोबतच आहेत
काँग्रेस आजही महाविकास आघाडी सोबतच आहेत
सरकारला अजूनही धोका नाही
राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार
भाजपचे नेते समोर का येत नाही?
शिंदे गटाचा पुढचा प्लॅन काय असणार?
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
-
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्वाचे नेते ट्रायडेंट हॉटेलला दाखल
– उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक आमदार ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल .
– आज 4:30 वा. राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्वाची बैठक
– बैठकीत महत्वाच्या घडामोडी घडतील अशी सुत्रांची माहिती
– राज्यात कदाचित वेगळी समीकरणे दिसतील अशीही सुत्रांची माहिती
जळगावच्या महापौर रडल्या
-
आमदारा नितीन देशमुख Live
या तोडाफोडीचे मुख्य सुत्रधार भाजपच, विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर शिंदेसाहेबांनी बंगल्यावर बोलावलं, गटनेत्याचा आदेश अंतिम असतो. मी तात्काळ बंगल्यावर गेलो, तिथं माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार प्रकाशबाऊ होते. त्यांनी ाम्हाला गाडीत बसवलं, चला जाऊया…आमच्या मनात कल्पना नव्हती. बसल्यावर गाडी ठाण्याच्या दिशेने गेली. त्यानंतर पालघरला गेलो. तिथं विचारल्यावर म्हणाले, वनगांकडे चाललोय. चहावाल्याविचारलं, तर ते म्हणाले, गुजरातला जातो. गुजरात तिथून 100 किमीवर आहे. सत्तार, देसाई, उंबरे आले, त्यांनी आम्हाला गाडीत बसावलं, गुजरातला गाडी निघाली. प्रकाशजींनी आमदारांना उतरवलं, सत्तार आणि उंबरे यांना बसवलं, त्यानंतर फ चालू जाले, त्यानंतर शंक्ा क्लिएर झाली. काहीतरी कटकारस्थान असल्याचं कळालं. प्रकाश सुर्वेंनी शंका उपस्थित केली तर ते म्हणाले तू बस गाडीत. त्यात कळालं कैलास गायब झाला.
पुढं सुरतला गेल्यानतंर 5 स्टार हॉटेल होती, मोठा पोलीस बंदोबस्त होता. अनेक आयपीएस अधिकारी, जे भाजपचे गुलामगिरी करत होते. हॉटेलमध्ये गेल्यानतंर कळालं, प्रकाश गायब झाला, त्यानतंर मी साहेबांना सांगितलं, मला इथं राहण्याची इच्छा नाही मी निघतो. मी रस्त्यात आल्यनंतर माझ्यामागे पोलीसांचा 100-150 पोलीसांचा ताफा होता. 12.30-3 च्या दरम्यान रात्री मी सुसाट रस्त्यावर चालत होतो. पाऊस होता. मी शिवसेना नेत्यांसी संपर्क केला. माझं संभाषण गुजरात पोलिसांच्या लक्षात आलं, वाहन थांबत नव्हतं. त्या 20-25 पोलिसांनी मला लाल रंगाच्या गाडीत कोंबलं, तिथं मला तिथल्या सरकारी हॉस्पीटलमध्ये नेलं. तिथं शंका आली, मला काहीही नसताना यांनी आणलं कशाला? मला तपासण्याची गरज नव्हती, तरी त्यांच्या हावभावावरुन शंका निर्माण झाली. त्यात एक डॉक्टर म्हणाला तुम्हाला हार्ट अटॅक आला. मला कळालं घातपात करण्याचा डाव आहे. कुणी हात पकडले, मान पकडली, पाय पकडले. इंजेक्शन टोचलं. मला रडू आलं, मला त्यावेळी माझी मुलगी आठवली, बायको आठवली.
त्यात भाजप कसं कटकारस्थान रचत आहे. तेच मला कळालं. तिथं मी शिवरायांच्या गनिमाकाव्याचा वापर केला. त्यानंतर मी गुवाहाटीतून सुटका केली. ज्यावेळी मी शिवसेनेचा आमदार झालो, त्यावेळी माझं जेवढं स्वागत माझं झालं नव्हतं. तेवढं स्वागत माझं शिवसैनिकांनी केली.
शिंदे गटातील आमदार आमच्यासोबत-विनायक राऊत
-
भंडारा शहरात उद्धव ठाकरेच्या समर्थनात शिवसैनिक आक्रमक
-
परत आलेले आमदार कैलास पाटील Live
मी कामासाठी गेलो होते, त्यानंतर आम्हाला ठाण्यातल्या महपौर बंगल्यावर नेलं
मला वाटलं शिंदे बाहेर कुणाच्यातरी घरी असतील
वसई-विरार हद्द संपत आली, माझ्या लक्षात आलं कायतर वेगळं होतंय
या गाड्या चेकपोस्टला पोहोचल्या, यावेळी शंका वाढली.
गाड्या थांबल्या यावेळी नाकाबंदी होती, आम्हाला चालत यायला सांगितलं
या संधीचा फायदा घेत मी ट्रॅफीकमधून डिव्हायडरच्या पलीकडे चालत आलो मुंबईच्या दिशने
मला माझ्या मागे हे येतील लक्षात आलं पुन्हा मी सुरच्या बाजुला गेलो आणि ट्रकच्या लाईनच्या आडून चालत आलो,
तोवर एक मोटर सायकल भेटली त्यानं मला थोड पुढे सोडलं
तेव्हा एक ट्रकवाला भेटला, बरेच ट्रकवाले आधी तयार झाले नाहीत
मी अनेक खासगी वाहनांनाही विनंतरी केली
मी गाडीतून पहिल्यांदा उतरलो तेव्हा मी माझ्या लोकांशी संपर्क साधला
माझ्या फोनची बॅटरी ही कमी होती, शेवटी मी ट्रकवाल्यांना विनंती केली
एक ट्रकवाला हा युपीची होता, त्यानं मी अडचणीत असल्याने माझी विनंती मान्य केली
तेव्हा पाऊस चालू होता, मी पावसातही भिजलो,
त्या ट्रकवाल्याने मला दहीसर टोलनाक्यावर सोडलं
एक व्यक्ती घ्यायला आली होती, ती व्यक्ती देवदूत बनून भेटला
मला ज्या शिवसेने एवढं काही दिलं त्याची प्रतारणा करणं योग्य नाही ही भावना मनता होती
अनेक आमदारांना यायची इच्छा आहे, मात्र त्यांना येता येत नाही
अनेक लोकांशी संपर्क झाला पण नंतर त्यांचे फोन बंद झाले
मुंबईत सरवणकरांच्या घराला काळं फासलं
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण करून भाजपने नेलं आहे
हा गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे
मी याबाबत वारंवार बोललो आहे
मी कैलास पाटील, आणि नितीन देशमुख यांना हेच सांगण्यासाठी समोर आणलं आहे
त्यांच्या ताब्यातल्या एकवीस आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे
त्या आमदारांना परत यायचं आहे
उद्धव ठाकरे यांच्याशीही आमदारांची चर्चा झाली आहे
हा संघर्ष कुठेही गेला तरी महाविकास आघाडीचा विजय होईल, तेवढा आकडा आमच्याजवळ आहे
-
एकनाथ शिंदे यांची आमदारांसोबत महत्वाची बैठक
-
शिंदेंसोबत 18 आमदार पुन्हा आमच्या संपर्कात
-
माझ्या बद्दल गैरसमज पसरवला जातोय
शिवसेना खासदार प्रतापराव जाधव टिकटॅक
माझ्या बद्दल गैरसमज पसरवला जातोय
मी उद्धव ठाकरेंचा आदेश मानणारा कार्यकर्ता
कोणीही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात नाही… imp
शिवसेना – भाजप सोबत येणं दोन्ही पक्षासाठी भल्याचं आहे, हिंदुत्व हा आत्मा आहे…
दोन्ही पक्ष वेगळे राहिले तर शिवसेनेचे नुकसान होईल, त्यामुळे त्यांनी एकत्र आलेयास सगळ्यांचा फायदा होईल…
हिंदुत्वाचं विभाजन झालं तर सेना – भाजपचं नुकसान
भाजपच्या मदतीने लोकसभेत निवडून आलो,
– माझ्या मतदारसंघातील २ आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले, मला माहीती नव्हती, मी शिवसेनेतच राहणार… शिवसेनेत दोन गट नाहीत, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय…
एनसीपी नेत्यांकडून सेना आमदारांना चुकीची वागणूक, सेना आमदारांना निधी दिला नाही, सापत्य वागणूक मिळाली…
उद्धव ठाकरे इनोसन्ट आहे पण एनसीपी नेते डावपेच खेळणारे आहेत, मी कुठेही जाणार नाही, मी शिवसेनेतच राहणार…
-
माझ्या बद्दल गैरसमज पसरवला जातोय, मी उद्धव ठाकरेंचा आदेश मानणारा कार्यकर्ता – प्रतापराव जाधव
शिवसेना खासदार प्रतापराव जाधव टिकटॅक
माझ्या बद्दल गैरसमज पसरवला जातोय
मी उद्धव ठाकरेंचा आदेश मानणारा कार्यकर्ता
कोणीही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात नाही… imp
शिवसेना – भाजप सोबत येणं दोन्ही पक्षासाठी भल्याचं आहे, हिंदुत्व हा आत्मा आहे…
दोन्ही पक्ष वेगळे राहिले तर शिवसेनेचे नुकसान होईल, त्यामुळे त्यांनी एकत्र आलेयास सगळ्यांचा फायदा होईल…
हिंदुत्वाचं विभाजन झालं तर सेना – भाजपचं नुकसान
भाजपच्या मदतीने लोकसभेत निवडून आलो,
– माझ्या मतदारसंघातील २ आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले, मला माहीती नव्हती, मी शिवसेनेतच राहणार… शिवसेनेत दोन गट नाहीत, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय…
एनसीपी नेत्यांकडून सेना आमदारांना चुकीची वागणूक, सेना आमदारांना निधी दिला नाही, सापत्य वागणूक मिळाली…
उद्धव ठाकरे इनोसन्ट आहे पण एनसीपी नेते डावपेच खेळणारे आहेत, मी कुठेही जाणार नाही, मी शिवसेनेतच राहणार…
-
एकनाथ शिंदेसोबत नेमके किती आमदार
-
आमदारांचं शक्तिप्रदर्शन एका क्लिकवर
बंड केलेल्या आमदारांचं शक्तीप्रदर्शन
गुवाहाटीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे
-
महाविकास आघाडी पडेल असं वाटत नाही, सरकार अजूनही मजबूत – प्रकाश आंबेडकर
महाविकास आघाडी पडेल असं वाटत नाही, सरकार अजूनही मजबूत…
कारण जरी समजा एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या पाठिंब्याचं पञ दिलं तरी त्या पञावर या आमदारांनी नेमकी कोणत्या मानसिकेत सह्या केल्यात हे तपासण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे…
मी जे सकाळी ट्विट केलं त्यावर मी ठाम आहे,माझ्या सोर्सनुसार मी ट्विट केल…
आमच्या मध्ये सहभागी व्हा,ही अट भाजप शिंदेंना घालू शकते…
त्यामुळे शिंदेच्या पाठिंब्यावर सरकार भाजप बनवेल अशी शक्यता कमी…
शिवसेना संपली असं वाटत नाही…तसंच आमदार फुटले म्हणून काही सेनेचं धन्युष्यबान हे चिन्ह जाईल असं नाही
-
उस्मानाबादचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख शिवसेने सोबतच
उस्मानाबादचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
मी शिवसेने सोबतच आहे आणी शिवसेने सोबतच राहणार
मला शिंदे गटाच्या कोणीही संपर्क केला नाही
माझी तब्येत खराब असल्याने मुंबईत उपचार घेत आहे
गडाख हे अपक्ष आमदार असून त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री पद मिळाले आहे त्यानंतर त्यांनी सेनेत प्रवेश घेतला
-
बंड केलेल्या आमदारांची यादी एका क्लिकवर
एकनाथ शिंदे
शहाजी पाटील
अब्दुल सत्तार
शंभुराज देसाई
अनिल बाबरतानाजी सावंत
संदीपान भुमरे
चिमणराव पाटील
प्रकाश सुर्वे
भरत गोगावलेविश्वनाथ भोईर
संजय गायकवाड
प्रताप सरनाईक
राजकुमार पटेल
राजेंद्र पाटीलमहेंद्र दळवी
महेंद्र थोरवे
प्रदीप जयस्वाल
ज्ञानराज चौगुले
श्रीनिवास वनगामहेश शिंदे
संजय रायमूलकर
बालाजी कल्याणकर
शांताराम मोरे
संजय शिरसाटगुलाबराव पाटील
प्रकाश आबिटकर
योगेश कदम
आशिष जयस्वाल
सदा सरवणकरमंगेश कुडाळकर
दीपक केसरकर
यामिनि जाधव
लता सोनावणे
किशोरी पाटीलरमेश बोरणारे
सुहासे कांदे
बालाजी किणीकरबच्चू कडू
राजकुमार पटेल
चंद्रकांत पाटील
नरेंद्र भोंडेकर -
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच्या समर्थनार्थ नागपुरमध्ये शिव सैनिकांची घोषणा बाजी..
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच्या समर्थनार्थ नागपुरमध्ये शिव सैनिकांची घोषणा बाजी..
रेशिमबाग मधील शिव सेना भवन समोर कार्यकर्त्यांनी एकत्रित येत केली घोषणा बाजी..
-
गुवाहाटीत असलेल्या आमदारांची घोषणाबाजी
एकनाथ शिंदेंच्या गटाचं गुवाहटीत शक्तीप्रदर्शन
जोरदार घोषणाबाजी
शिंदेसाहेब आगे बडो…हम तुम्हारे साथ है
बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
-
सध्या शिवसेनेत असलेले आमदार
- आमदारांची यादी
-
बंड केलेल्या आमदारांचं शक्ती प्रदर्शन
एकनाथ शिंदेंसोबत एकूण 42 आमदार, गुवाहाटीत शिंदेंचं शक्तीप्रदर्शन
-
Shivsena Political Crisis |एकनाथ शिंदे गट स्वतःलाच शिवसेना असल्याचा दावा करणार का?
-
शिवसेनेच्या आमदारांची वर्षावर बैठक संपन्न, 13 आमदार उपस्थित असल्याची माहिती
शिवसेनेच्या आमदारांची वर्षावर बैठक संपन्न, 13 आमदार उपस्थित असल्याची माहिती
बंडखोर नेत्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधा
आमदारांना संपर्क साधून समजून सांगण्याचा प्रयत्न करा
शिवसेना नेते संजय राऊत वर्षावर दाखल
-
Eknath Shinde : भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात…ही आहे आमदारांची भावना…
-
Maharashtra Political Crisis | सरकार कोसळल्यास संघर्षाची तयारी ठेवा | शरद पवारांची सूचना सूत्र
-
Dilip Lande at St. Hotel | धनुष्य बाणाच्या चिन्हावर काय म्हणाले दिलीप लांडे?
-
जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
-
शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ नॉट रिचेबल, विमानतळाकडे रवाना झाल्याची माहिती
शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ ही गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत अडसूळ विमानतळाकडे रवाना झाला आहे.
-
जळगावात महापौरांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक उतरले रस्त्यावर
जळगावात महापौरांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक उतरले रस्त्यावर
बंडू पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांना गुन्हा परत येण्याचे शिवसैनिकांचे भावनिक आवाहन
महापौर जयश्री महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो घेऊन ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर
-
राजकीय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
राजकीय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
-
एकनाथ शिंदेंच्या बंडात छेद कधी होणार? जयंत पाटलांनी तो क्षण नेमका सांगितला
-
NCP: एकनाथ शिंदे म्हणतात, अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, आता जयंत पाटील म्हणतात, आमच्या आमदारांचा अभिमान
-
शिंदे गट सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्याच्या तयारीत, उल्हास बापट म्हणतात
-
बंडखोर आमदारांना सोडून स्वत:हून परत आलो – कैलास पाटील