Eknath Shinde : एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे म्हणतात, “बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा, मी शिवसैनिक!”

| Updated on: Jun 27, 2022 | 3:21 PM

एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे.

Eknath Shinde : एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे म्हणतात, बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा, मी शिवसैनिक!
Follow us on

मुंबई : एकीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे “बंड नव्हे, तर हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा… मी शिवसैनिक!” असं ट्विट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलंय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलाय. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. त्याबाबत आज सुनावणी पार पडली आहे. एकनाथ शिंदे गटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी त्या 16 आमदारांना नोटीस बजावत दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. आमदार निलंबन आणि गटनेता कारवाईविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरची सुनावणी पार पडली. आता पुढची सुनावणी 11 जुलैला होणार आहे.

एकनाथ शिंदे यांचं ट्विट

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी चार पानी पत्र सादर केलं आहे. त्यावर आम्ही संपणार नाही, महाराष्ट्राला पुन्हा नव्या उंचीवर नेल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही, असा मजकूर आहे. त्याला “हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी… बंड नव्हे,शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!”, असं कॅप्शन केसरकरांनी दिलं आहे. त्यांचं हे ट्विट रिट्विट करत शिंदे यांनी हॅशटॅग मी शिवसैनिक असं कॅप्शन दिलं.

हे सुद्धा वाचा

सुनावणी दरम्यान काय झालं?

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तूर्तास तरी बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार नाही. सुप्रीम कोर्टात झालेल्या आज झालेल्या सुनावणीनंतर नवी तारीख देण्यात आली आहे. 11 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटीसीला उत्तर देण्याची आज शेवटची मुदत होती. आता सर्व कागदपत्र आणि सर्व पक्षकारांची बाजू सुप्रीम कोर्ट ऐकून घेणार त्यानंतर निकाल समोर येईल.