AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: पावला पावलावर पोलीस, रस्ते ब्लॉक, कडेकोट बंदोबस्तात बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला

आसामला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार आजच गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.

Eknath Shinde: पावला पावलावर पोलीस, रस्ते ब्लॉक, कडेकोट बंदोबस्तात बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला
कडेकोट बंदोबस्तात बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनालाImage Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 29, 2022 | 1:09 PM
Share

गुवाहाटी: पावला पावलावर, प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस, रस्ते ब्लॉक, कडेकोट बंदोबस्तात शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. आमदारांच्या सुरक्षेची काळजी पावलोपावली घेण्यात येत असल्याचं दिसून येतंय. 2 बसेसमधून बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. आसामला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार आजच गोव्याच्या (Goa) दिशेने रवाना होणार आहेत. त्या आधी या आमदारांनी देवीच्या दर्शनासाठी कडेकोट बंदोबस्तात हजेरी लावल्याचं दिसून आलं. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीच्याच (Guwahati) हॉटेलमध्ये परतणार आहेत. दुपारी 3.30 च्या सुमारास आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133

शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी

मागील आठ दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर ठेवलेल्या एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाआता बहुमत चाचणीसाठी  महाराष्ट्रात आणण्याचं मोठं आव्हान आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आवाहनाला किंवा धमक्यांना बळी न पडलेल्या आमदारांना बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या वतीने एक मेगा प्लॅन आखल्याची विश्वसनीय माहिती TV9 कडे आली आहे.

शिंदे गट बहुमत चाचणीला कसे पोहचणार

  • कामाख्या देवीच्या दर्शनानंतर गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये परतणार
  • दुपारी 3.30च्या सुमारास गोव्यासाठी रवाना होणार
  • 5.30 ते 6.30 च्या दरम्यान गोव्यात पोहचणार
  • गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये आज मुक्काम
  • उद्या सकाळी 8 वाजता मुंबईत येणार
  • नाश्ता करून विधानभवनात दाखल होणार
  • बहुमत चाचणी 11 वाजता

गुवाहटीतून थेट मुंबई का नाही?

आसामची राजधानी गुवाहटी येथे सध्या एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार वास्तव्यास आहेत. मात्र मागील काही दिवासंपासून आसाममध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. आज आणि उद्या तर आसाममध्ये अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी गुवाहटीहून थेट मुंबईत विमानाने यायचं असं नियोजन केलं आणि पावसामुळे विमानाचं उड्डाण झालं नाही तर, आमदार बहुमत चाचणीसाठी विधानभवनापर्यत पोहोचू शकणार नाहीत. तसेच आमदारांना शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्याचंही आव्हान आहे. त्यामुळेच शिंदेसेना आणि भाजपच्या वतीने असा मेगाप्लॅन करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...