ARMC Election 2022 | अमरावती महापालिकेवर भाजपचं वर्चस्व, प्रभाग क्रमांक 13 मध्ये यंदाही कमळ फुलणार का?

| Updated on: Aug 06, 2022 | 1:54 PM

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण लोकसंख्या 18 हजार 170 एवढी आहे. येथील अनुसूचित जातींतील मतदार 7 हजार 477 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींतील मतदारांची संख्या 432 एवढी आहे.

ARMC Election 2022 | अमरावती महापालिकेवर भाजपचं वर्चस्व, प्रभाग क्रमांक 13 मध्ये यंदाही कमळ फुलणार का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावतीः राज्यात मोठं सत्तांतर घडून आल्यानंतर आत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे (Local boby Elections) जनतेचं लक्ष लागलं आहे. मुंबईसह मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातही राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. आता महापालिकांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद दिसणार आहेत. राज्यातील पहिल्या टप्प्यातील महापालिकांची निवडणूक येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. अमरावती (Amaravati) महापालिकेची निवडणूकही याच काळात होईल. 2017 मधील निवडणुकीत भाजपची सत्ता असलेल्या अमरावती महापालिकेत यंदाही कमळच फुलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रभाग क्रमांक 13 चा विचार करता येथे मागील निवडणुकीत भाजपची सत्ता होती. येथील चारही प्रभागांवर भाजप नगरसेवकाचा विजय झाला होता. पण यंदा नव्या प्रभाग रचना तीन सदस्यांची आहे.  येथील परिसराची व्याप्तीही बदलण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागातील वॉर्डांच्या सीमा बदलल्या असल्या तरीही मागील निवडणुकीतील चित्रावरून आगामी काळात प्रभागावर कुणाची सत्ता येईल, याचे आडाखे बांधता येऊ शकतात. अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 13 ची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-

प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोणता भाग?

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा हा परिसर प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 13 मध्ये समाविष्ट होतो. यासह भूमिपूत्र कॉलनी, स्विपर कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, संजय गांधी नगर नं 1, यशोदा नगर, शिक्षक कॉलनी, कृषी कॉलनी इत्यादी भाग या प्रभागात येतो.

हेही महत्त्वाचे

अमरावती महपालिकेतील अंतिम प्रभाग रचनेनुसार, येथे 33 प्रभाग असून 98 वॉर्ड असतील. यातील अनुसूचित जातींसाठी 17, अनुसूचित जमातींसाठी दोन आणि महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत.एकूण 33 प्रभागांपैकी 32 प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. तर एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे. अमरावतीची एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हजार 057 एवढी आहे. महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे.

लोकसंख्येचं गणित काय?

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण लोकसंख्या 18 हजार 170 एवढी आहे. येथील अनुसूचित जातींतील मतदार 7 हजार 477 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींतील मतदारांची संख्या 432 एवढी आहे.

आधीच्या निवडणुकीचं चित्र कसं?

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये 2017 मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे-

  • प्रभाग 13 अ- अजय सारसकर (भाजप)
  • प्रभाग 13 ब- लविना गजेंद्र हर्षे (भाजप)
  • प्रभाग 13 क- स्वाती चंद्रशेखर कुळकर्णी (भाजप)
  • प्रभाग 13 ड- प्रणित राजेंद्र सोनी (भाजप)

प्रभागात आरक्षण कसे?

अमरावती महापालिकेसाठी आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. त्यातील चित्र पुढीलप्रमाणे-

  • प्रभाग 13 अ- अनुसूचित जाती महिला
  • प्रभाग 13 ब-सर्वसाधारण महिला
  • प्रभाग 13 क- सर्वसाधारण

अमरावती 2017 मधील पक्षीय बलाबल

  • भाजप-45
  • शिवसेना-07
  • काँग्रेस-15
  • एमआयएम-10
  • बसपा-5
  • रिपाई (आठवले गट)-1
  • स्वाभिमानी पार्टी-3
  • अपक्ष- 1
  • एकूण- 81

अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक 13 अ  

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
एमआयएम
बसपा
इतर

अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक 13 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
काँग्रेस
बसपा
एमआयएम
शिवसेना
इतर

अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक 13 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
एमआयएम
बसपा
इतर