Eknath Shinde Corona | एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

| Updated on: Sep 24, 2020 | 4:31 PM

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Aaditya thackeray on Eknath Shinde Corona) 

Eknath Shinde Corona | एकनाथ शिंदेंना कोरोना, आदित्य ठाकरेंनी दिला हा सल्ला
Follow us on

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांना मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. “आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल,” असे ट्विट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच “पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा,” असा सल्लाही आदित्य ठाकरेंनी दिला आहे. (Aaditya thackeray on Eknath Shinde Corona)

“एकनाथ शिंदेंजी काळजी घ्या, गेले ६ महिने कोरोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईन वरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा!”असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली. “गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने काल त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठिक आहे. काळजी करू नका. परंतु, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोव्हिड चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंशिवाय उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अजय चौधरी, आमदार विश्वजीत कदम आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही एकनाथ शिंदेना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या कार्याचा झंझावात सुरूच आहे. आता मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. भरपूर विश्रांती घ्या. योग्य उपचारानंतर आपण लवकर बरे व्हाल आणि पुन्हा जनसेवेत झोकून द्याल,” असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.(Aaditya thackeray on Eknath Shinde Corona)

 संबंधित बातम्या : 

Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना करोना

Covid-19 Vaccine | अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात, 60 हजार जणांवर प्रयोग