Video : ‘मला बदला घ्यायचा होता, असं माजी मुख्यमंत्री स्पष्ट म्हणालेत’ राजकारण आणखी तापलं!

| Updated on: Nov 15, 2022 | 10:46 AM

'माजी मुख्यमंत्री सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती' ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका, एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल

Video : मला बदला घ्यायचा होता, असं माजी मुख्यमंत्री स्पष्ट म्हणालेत राजकारण आणखी तापलं!
ठाकरे गटाच्या नेत्यानं केली जोरदार टीका
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय. माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती आहेत, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली. शिवाय माजी मुख्यमंत्री यांनी स्वतः काल परवा मला बदला घ्यायचा होतं, असं स्पष्ट म्हटलं होतं, याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. अरविंद सावंत दिल्लीत टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला. ठाण्यात झालेल्या राड्यावरुनही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की,…

माझ्या विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, हे त्यांना (एकनाथ शिंदे यांना) झोंबलंय, म्हणून ही प्रतिक्रिया आली. ही प्रतिक्रिया मागे बोलत राहते, ‘तुम्ही बघत बसला का?’

हे सुद्धा वाचा

या प्रतिक्रियेतूनच हात चालवला असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर केलाय. दरम्यान, या राड्यात स्थानिक लोकं नाहीत, त्यात बाहेरुन आलेली लोकं होती, असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, रात्री उशिरा शिंदे-फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीवरुनही अरविंद सावंत यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना रात्री भेटायची सवयच आहे असं ते म्हणाले. त्यांनी याआधी जे कट कारस्थान रचलं, ते तर वेशांतर करुन केलं आणि त्यावर सभागृहातही त्यांनी सांगितलं होतं, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं होतं. त्याविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. शिंदे गट अंधेरी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे गेला, पण त्यांनी निवडणूक लढवलीच नाही. शिंदे गट धादांत खोटं बोलल्याचाही पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नावपुन्हा मिळावं यासाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. आज या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे.