फेकाफेकीने लक्ष्मीही थक्क, राज ठाकरेंचे फटकारे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मोदी सरकार आणि फडणवीस सरकारला व्यंगचित्रातून फटकारे चालूच आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले […]

फेकाफेकीने लक्ष्मीही थक्क, राज ठाकरेंचे फटकारे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मोदी सरकार आणि फडणवीस सरकारला व्यंगचित्रातून फटकारे चालूच आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यांच्यापुढे लक्ष्मी उभी आहे आणि ती म्हणते, की बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे. लक्ष्मीपूजन असा मथळा देऊन हे व्यंगचित्र साकारण्यात आलंय.

 

मोदींचं भाषण आणि गडकरींनी जाहीर केलेले पॅकेज आणि त्यातले हजारो कोटींची आकडे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गडकरींच्या आकडेवारीवर राज ठाकरे यांनी यापूर्वीही एकदा निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सरकारच्या घोषणांवर फेकाफेकी असा उल्लेख करत निशाणा साधलाय.

यापूर्वीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. अभ्यंगस्नानाच्या वेळी त्यांनी हे व्यंगचित्र जारी केलं होतं. अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय, पाठवू का? असा सवाल करत राज ठाकरेंनी टोला लगावला होता.