ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर, रावसाहेब दानवेंचा टोला

ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा पहिला नंबर आला आहे, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांनी टोला लगावला.

ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर, रावसाहेब दानवेंचा टोला
Raosaheb Danve
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 2:10 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा पहिला नंबर आला आहे, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांनी टोला लगावला. ते दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आता ऑनलाईन परीक्षेत ते पास झाले आहेत, त्यांनी आता आरक्षण द्यावे नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही”, असं दानवे म्हणाले. (Minister Raosaheb Danve c)

यावेळी दानवे यांनी मुंबई लोकल रेल्वे, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. तसंच त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभावर प्रश्न उपस्थित केले.

मराठा आरक्षण

काही गणितं केंद्राने सोडवली आहेत, आता काही गणितं राज्य सरकारने सोडवावीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकवर आले आहेत. ते ऑनलाईन परीक्षेत पास झाले आहेत. आता त्यांनी आरक्षण द्यावे, नाहीतर जनता माफ करणार नाही, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला.

मुंबई लोकल

लोकल रेल्वे सर्व सामन्यांना सुरू करण्याचा निर्णय एक मिनिटात घेऊ. राज्याने फक्त अहवाल पाठवावा. आम्ही राज्य सरकारच्या अहवालाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे, असं दानवे म्हणाले.

VIDEO :

संबंधित बातम्या  

Raosaheb Danve | लोकलबाबत राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल : रावसाहेब दानवे