निवृत्त लष्कर उपप्रमुख सरत चंद यांचा भाजपात प्रवेश

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक नाव भाजपशी जोडलं गेलंय. निवृत्त लेफ्टनंट जनरल सरथ चंद यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सरथ चंद यांनी सैन्याचे उपप्रमुख म्हणूनही कर्तव्य बजावलं आहे. जानेवारी 2017 ते निवृत्तीपर्यंत म्हणजे जून 2018 पर्यंत ते सैन्याचे उपप्रमुख होते. […]

निवृत्त लष्कर उपप्रमुख सरत चंद यांचा भाजपात प्रवेश
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक नाव भाजपशी जोडलं गेलंय. निवृत्त लेफ्टनंट जनरल सरथ चंद यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सरथ चंद यांनी सैन्याचे उपप्रमुख म्हणूनही कर्तव्य बजावलं आहे. जानेवारी 2017 ते निवृत्तीपर्यंत म्हणजे जून 2018 पर्यंत ते सैन्याचे उपप्रमुख होते. भाजप ही फौजीची पहिली पसंत आहे, असं त्यांनी सांगितलं.

भाजप प्रवेश करताना सरथ चंद म्हणाले, “राजकारणात येण्याबाबत कधी विचार केला नव्हता. पण सध्याची जी वेळ आहे, त्यात एका मजबूत नेतृत्त्वाची गरज आहे. मी पंतप्रधान मोदींमुळे झालोय आणि देशसेवेत मदत करण्याची इच्छा आहे.” 39 वर्ष सैन्यात सेवा बजावली. भाजपने सैन्यासाठी जे केलंय, ते कुणीही केलं नाही. भाजप ही प्रत्येक फौजीची पहिली पसंत आहे, असंही ते म्हणाले.

शरत चंद यांनी 1979 मध्ये गढवाल रायफल्समधून करिअरची सुरुवात केली. गेल्या वर्षी 1 जून रोजी ते भारतीय सैन्याचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झाले. सैन्यात त्यांनी अनेकदा सक्रियपणे युद्ध नेतृत्त्व म्हणून भूमिका बजावली आहे. दरम्यान, सरत चंद यांनी गेल्या वर्षी कमी संरक्षण बजेट आणि जुन्या सैन्य मशिनरीमुळे भाजपवर टीकाही केली होती.