Ratnakar Gutte : गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल, महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप, वाचा प्रकरण काय?

Ratnakar Gutte : गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल, महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप, वाचा प्रकरण काय?
गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल
Image Credit source: tv9

शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप गुट्टे यांच्यावर लावण्यात आला आहे. गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा येथील महिलेने गंगाखेड पोलिसांत गुट्टे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

नजीर खान

| Edited By: दादासाहेब कारंडे

May 21, 2022 | 6:23 PM

परभणी : गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे पुन्हा एकदा नव्या वादाने चर्चेत आले आहेत. गुट्टे यांच्यावर आता गुन्हा दाखल (Gangakhed Police) करण्यात आलाय. कारण शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याचा गंभीर आरोप गुट्टे यांच्यावर लावण्यात आला आहे. गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा येथील महिलेने गंगाखेड पोलिसांत गुट्टे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. रत्नाकर गुट्टेंसोबत इतर 30 ते 35 इसमांनी मारहाण केल्याचा फिर्यादीचा दावा आहे. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड येथील रासपचे आमदार आहेत. त्यांच्यावर कलम 354 (ब) 324, 184, 147, 149, 323, 504, 506 आणि 135 बी.पी.अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे. रत्नाकर गुट्टे हे वादात सापडण्याची  ही पहिलीच वेळ नाही. आधीही एका प्रकरणात रत्नाकर गुट्टे हे जेलमदध्ये होते. विशेष म्हणजे ते ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले त्यावेळीही ते जेलमध्येच होते.

जमिनीच्या वादातून घडला प्रकार

फिर्यादी महिला गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा या गावाशी रहिवाशी आहे .दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात गंगाखेड पोलीस विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील कारवाई गंगाखेड पोलिस करत आहेत . गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा येथील शेषेराव कोरके हे पत्नी तारामती कोरकेसह शेतात मध्ये काम करीत आसताना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे ,बाबा पोले, हनुमान लटपटेसह ईतर 30 ते 35 जणांनी शेतातून निघून जा शेत सोडा म्हणत जबर मारहाण करीत शेषेराव कोरके यांच्या पत्नीचा विनयभंग केला आहे असा दावा पीडित महिलेचा आहे , फिर्यादी यांची गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा शिवारात शेत सर्वे नं 6/3 मध्ये साडेतीन एक्कर जमीन आहे . सदर जमीनीबाबत आमदार रत्नाकर गुट्टे, बाबा पोले व हनुमान लटपटे या तिघां सोबत मागील दहा वर्षा पासुन वाद चालू आहे.

नेमकं काय घडलंं?

या वादाबाबत न्यायालयात दावा ही दाखल आहे . काल 20 मे शुक्रवार रोजी फिर्यादी आणि त्यांचे पती शेषेरावजी दोघे शेतात काम करीत असताना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे,बाबा पोले व हनुमान लटपटे सह त्यांचे सोबत इतर 30 ते 35 अनोळखी इसम तीन बोलेरो जीप मध्ये ट्रक्टरसह शेतामध्ये आले व फिर्यादी व त्यांच्या पतीस या शेतातून तुम्ही निघून जा हे शेत आमचे आहे. तुम्ही जर निघुन गेला नाहीत तर आम्ही तुम्हाला याच शेतामध्ये जेसीबी ने खड्डा खोदून खडयात पुरून टाकू अशी धमकी देवून शिवीगाळ करून लाथाबुक्याने पाठीत, पोटात, पायावर मुका मार दिला, त्यावेळी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे हे मारहाण करून निघून गेले , असल्याची आरोप पीडित महिलेने तक्रार केली आहे .

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें