Nana Patole : गणपती दर्शन संपलं, शेतकऱ्यांचे पैसे केव्हा देणार, नाना पटोले यांचा राज्य सरकारला सवाल

| Updated on: Sep 10, 2022 | 2:30 PM

राज्यात अतिवृष्टी झाली. 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या राज्य सरकारनं ठेवल्या. त्यात शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही. गणपती दर्शनात सर्व सरकार लागलं होतं. आता गणपती दर्शन संपलं. आता शेतकऱ्यांचे पैसे केव्हा देणार, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.

Nana Patole : गणपती दर्शन संपलं, शेतकऱ्यांचे पैसे केव्हा देणार, नाना पटोले यांचा राज्य सरकारला सवाल
Follow us on

अकोला : उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाही, तेही बिन खात्याचे मंत्री आहेत. आतापर्यंत पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 18 मंत्री करण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मंत्रिमंडळाचा विस्तार सरकार पडेल या भीतीपोटी करत नाही. सरकार पडलं तर आमच काय, म्हणून या विषयावर जनतेच नुकसान झालं तरी चालेल. सत्तेमध्ये बसून राज्य कसं विकता येईल. याच्यावरच राज्य सरकार काम करत आहे, अशी टीकाही पटोले यांनी राज्य सरकारवर केली.

नाना पटोले म्हणाले, महागाईच्या विषयावर हे सरकार बोलायला सुद्धा तयार नाही. मात्र मलाई खाण्यासाठी गुवाहटीला गेले. महाराष्ट्राची बदमानी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली. महाराष्ट्राच्या जनतेची झाली. त्याची यांना चिंता नाही.

फक्त राज्य विकण्यासाठी आणि राज्यातील जनतेच्या घामाचा पैसा खाण्यासाठी हे सरकार काम करतेय. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही. जिल्ह्याला पालकमंत्री द्यायचा नाही. ही लाईन भाजपने घेतली आहे. यासह अनेक मुद्द्यांवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकार हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात अतिवृष्टी झाली. 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या राज्य सरकारनं ठेवल्या. त्यात शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही. गणपती दर्शनात सर्व सरकार लागलं होतं. आता गणपती दर्शन संपलं. आता शेतकऱ्यांचे पैसे केव्हा देणार, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, महागाईचा विषय हा राज्यांचा आहे. महाराष्ट्र हे सगळ्यात किमती राज्य आहे. सगळ्यात जास्त किमती राज्यात आहेत. डिझेल, पेट्रोल, खाद्यान्न या सगळ्या वस्तू देशात महाराष्ट्रात महाग आहेत. महागाईच्या विषयावर हे सरकार म सुद्धा बोलायला तयार नाही, अशीही बोचरी टीका पटोले यांनी केली.