EVM घेऊन जाणाऱ्या वाहनांवर जीपीएस

रत्नागिरी : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदान आता काही तासांवर आलं आहे. लोकशाहीच्या महासंग्रामात निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक विभागानं यावेळी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघासह 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम  घेऊन जाणाऱ्या वाहनांवर, जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यानुसार लोकसभेसाठी मतदान होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी ही आत्याधुनिक व्यवस्था […]

EVM घेऊन जाणाऱ्या वाहनांवर जीपीएस
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

रत्नागिरी : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदान आता काही तासांवर आलं आहे. लोकशाहीच्या महासंग्रामात निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक विभागानं यावेळी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघासह 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम  घेऊन जाणाऱ्या वाहनांवर, जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यानुसार लोकसभेसाठी मतदान होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी ही आत्याधुनिक व्यवस्था असेल.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदान केंद्रात, मतदान यंत्रे ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाते. मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे.

वाहन मतदान यंत्र घेऊन कुठे चाललं आहे, यावर जीपीएस यंत्रणा लक्ष ठेवण्यास मतद करू शकेल. त्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. 2442 मतदान यंत्रावर या यंत्रणेद्वारे त्याची ने-आण करताना प्रशासनाची बारीक नजर असेल.

जीपीएस कुठे कुठे?

  • जीपीएस यंत्रणा मतदान यंत्राची ने-आण करणाऱ्या वाहनावर लावण्यात आली आहे.
  • वाहन चालकांना न सांगता गुप्त जागी ही यंत्रणा वाहनात बसवण्यात आली आहे.
  • जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत मॉनिटरिंग कक्ष असेल