AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरात विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल, भाजपकडून जल्लोषाची जोरदार तयारी

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चा निकाल उद्या लागणार आहे. बहुप्रतिक्षित गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष असेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं हे राज्य आहे. गुरुवारी भाजप, काँग्रेस आणि आपच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) गेल्या 27 वर्षांपासून सरकारमध्ये आहे. यावेळीही त्यांना […]

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरात विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल, भाजपकडून जल्लोषाची जोरदार तयारी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 07, 2022 | 10:34 PM
Share

Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चा निकाल उद्या लागणार आहे. बहुप्रतिक्षित गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष असेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं हे राज्य आहे. गुरुवारी भाजप, काँग्रेस आणि आपच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) गेल्या 27 वर्षांपासून सरकारमध्ये आहे. यावेळीही त्यांना राज्यात बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजपचे अनेक स्टार प्रचारक गुजरातमध्ये तळ ठोकून होते. एक्झिट पोलच्या निकालात देखील भाजप (BJP) बहुमत मिळवेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा AAP हा नवा स्पर्धक असल्याने राज्यातील काँग्रेसच्या मतांचा वाटा कमी होण्याची अपेक्षा आहे.

भाजपने राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून जाहीर केले होते.आपने इसुदान गढवी यांना गुजरातचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. गुजरातमध्ये 182 जागांसाठी मतदान झालं. हार्दिक पटेल, रिवाबा जडेजा, लखाभाई भारवाड आणि अल्पेश ठाकोर यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

सकाळी 8 वाजता मतमोजणी

गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी सांगितले की मतमोजणी प्रक्रियेसाठी 182 मतमोजणी निरीक्षक, 182 निवडणूक अधिकारी आणि 494 सहायक निवडणूक अधिकारी कर्तव्यावर असतील.

भाजपकडून जल्लोषाची तयारी

गुजरातमधील भाजप मुख्यालयात जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. कारण एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसतंय. भाजपकडून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन