Crorepati MLA : कोण आहेत भाजपचे करोडपती आमदार? मजूरीपासून केली सुरुवात, असे पालटले नशीब, आज आहे 661 कोटी रुपयांचे साम्राज्य..

| Updated on: Dec 08, 2022 | 4:41 PM

Crorepati MLA : गुजरातमधील भाजपचे सर्वात श्रीमंत आमदार ज्यांनी कधी काळी केली होती मजूरी..कसे पालटले नशीब..

Crorepati MLA : कोण आहेत भाजपचे करोडपती आमदार? मजूरीपासून केली सुरुवात, असे पालटले नशीब, आज आहे 661 कोटी रुपयांचे साम्राज्य..
आमदाराची श्रीमंती
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकालाने (Gujarat Election Result 2022) चित्र स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मनसा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार जयंतीभाई सोमाभाई पटेल (Jayanti Bhai Soma Bhai Patel) यांची जोरदार चर्चा सुरु आहे. मनसा विधानसभा निवडणुकीत (Mansa Assembly Seat) त्यांनी 39266 मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय मिळवला. पण खरी चर्चा आहे ती त्यांच्या श्रीमंतीची.

मनसा विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणणारे जयंतीभाई पटेल हे गुजरात निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाला दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या श्रीमंतीच्या आकड्यांनी अधिकारीही घामाघूम झाले. त्यांची एकूण संपत्ती 661 कोटी रुपये असल्याचे त्यांनी शपथेवर सांगितले आहे.

64 वर्षांचे पटेल हे मूळ मनसामधील अजोल गावाचे रहिवाशी आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या जयंती भाईंनी कष्टाच्या जोरावर मोठे साम्राज्य उभे केले. ते सर्वात श्रीमंत आमदार आहेत. पण ही श्रीमंती त्यांना एका दिवसात मिळाली नाही. ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते.

हे सुद्धा वाचा

उदरनिर्वाहसाठी त्यांनी अनेक दिवस गावात, अनेकांच्या शेतात मजूरी केली. त्यावेळी शेतातील मजूरी करुन दिवसाकाठी ते 100-200 रुपये कमवित होते. पण नंतर त्यांनी अहमदाबाद गाठले. येथे त्यांनी नौकरी स्वीकारली. येथे ही त्यांना सुरुवातीला 100-200 रुपये मिळत होते.

पण नौकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यांनी विविध उद्योगधंदात नशीब आजमावले. त्यांनी लोखंडाच्या व्यवसायात उडी घेतली. हळूहळू मेहनतीला फळ मिळाले. त्यांचे नशीब फळफळले. आज ते 661 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

निवडणूक आयोगाला दाखल केलेल्या शपथपत्रात, दरवर्षी त्यांची कमाई 44.22 लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांची पत्नी आनंदी पटेल यांच्या नावावर 2 कोटी रुपयांचे दागिने आहेत. त्यांची एकूण संपत्ती 63.7 कोटी रुपयांची आहे.

जयंती पटेल यांच्याकडे 514 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तर 147 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. त्यांच्या डोक्यावर 233.8 कोटी रुपयांचे कर्जही आहे. त्यांचा मुलगा व्यवसाय सांभाळतो.