Gujrat Elections: गुजरातेत भाजप अमित शहांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवणार? केजरीवालांचं खोचक ट्विट, निवडणुकांसाठी मजबूत रणनीती काय?

| Updated on: Aug 05, 2022 | 5:52 PM

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. येथील जनतेला आम आदमी पक्षाच्या वतीने आश्वासनंही दिली जात आहेत.

Gujrat Elections: गुजरातेत भाजप अमित शहांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवणार? केजरीवालांचं खोचक ट्विट, निवडणुकांसाठी मजबूत रणनीती काय?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः दिल्ली, पंजाब काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाने (Aam Admi Party) आता पक्षाने आता गुजरात विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. गुजरातमध्ये आप पक्षसंघटन वेगाने विस्तारत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुका (Gujrat Assembly Elections) होणार असल्या तरीही आपने पहिल्या १० उमेदवारांची लीस्ट जाहीर केली आहे. आगामी निवडणुकांसाठी आम आदमी पार्टी नियोजनपुर्वक तयारी करत असल्याचं यातून सूचित होतंय. एवढ्या लवकर उमेदवारांची यादी जाहीर करतोय, कारण आम्हाला मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जायचंय, आमचं म्हणणं पोहोचवायचंय, असं वक्तव्य आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केलंय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांनी आतापासूनच गुजरात दौरे वाढवले. बुधवारी याच संदर्भाने त्यांनी एक ट्विट केलं. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप गुजरातमध्ये अमित शहांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करणार? भूपेंद्र भाई पटेल यांच्या कामावर भाजपसुद्धा नाराज आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

केजरीवालांचं ट्विट काय?

10 उमेदवारांची यादी जाहीर

आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकांसाठी पहिल्या दहा उमेदवारांची यादीदेखील जाहीर केली आहे. यात गुजरातचे अध्यक्ष गोपाल इटालिया, इसुदान गढवी हे दोघे तर आहेतच. त्याशिवाय शेतकरी नेते भीमाभाई चौधरी (दियोदर मतदार संघ), सामाजिक कार्यकर्ते जगमाल वाला हे सोमनाथ येथून, आदिवासी समुदायाचे नेते अर्जुन राठवा हे छोटा उदयपूर येथून, शेतकरी नेते सागर रबारी हे बेचराजी येथून, दलित नेता वसराम सागठिया हे राजकोट ग्रामीणमधून निवडणूक लढवतील. सामाजिक कार्यकर्ते राम धडुक हे सूरतच्या कामरेजमधून, व्यापारी नेते शिवलाल बारसिया हे राजकोट दक्षिण मतदार संघातून तर गरियाधार येथून सुधीर वाघाणी, बारडोली मतदारसंघातून राजेंद्र सोळंकी आणि अहमदाबादच्या नरोडा येथून प्रकाश तिवारी हे आपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.

आपची आश्वासनं काय?

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. येथील जनतेला आम आदमी पक्षाच्या वतीने आश्वासनंही दिली जात आहेत. गुजरातमधील तरुणांना 10 लाखांहून अधिक नौकऱ्या मिळतील. यासाठी आम्ही एका टीमसोबत नियोजन करत असल्याचं केजरीवालांनी सांगितलंय. गुजरातमधील परीक्षा पेपर लीक होणार नहाी, यासाठी नवीन कायदा आणू, सहकार क्षेत्रातील नोकऱ्यांची प्रक्रियादेखील पारदर्शक असेल, नोकरी मिळण्यासाठी लाच घेण्याचे प्रकार बंद होतील, असेही दावे आपच्या वतीने करण्यात येत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुजरातमध्ये सुरुवातीचे 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केजरीवालांनी केलीय. महागाईमुळे वीजबिल सामान्यांना परवडत नाहीये. आम्ही दिल्लीत आणि पंजाबमध्ये मोफत वीज दिली, आता गुजरातमध्येही सरकार आल्यास मोफत वीज देऊ, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलंय.