“शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात”

राज्यात सत्तेचं काय होईल, हे सांगता येत नाही. परंतु सत्तेचा जोकर शिवसेनेच्या (Gulabrao patil on maharashtra government formation) हातात आहे, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते आणि माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

शिवसेना ठरवेल तेच होईल, सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात
Follow us
| Updated on: Nov 21, 2019 | 8:38 PM

जळगाव : राज्यात सत्तेचं काय होईल, हे सांगता येत नाही. परंतु सत्तेचा जोकर शिवसेनेच्या (Gulabrao patil on maharashtra government formation) हातात आहे, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते आणि माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. आज (21 नोव्हेंबर) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याप्रसंगी गुलाबराव पाटील (Gulabrao patil on maharashtra government formation) यांनी हा विश्वास व्यक्त केला.

“राज्यात सत्तेचं काय होईल, हे सांगता येत नाही. परंतु सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात आहे. शिवसेना ठरवेल तेच होईल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

गोरखतात्या पाटील यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक राजकीय मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी अनेकांनी शिवसेनेचे सरकार लवकर होवो, गुलबाराव पाटील कॅबिनेट मंत्री होवो, अशा शुभेच्छा पाटील यांना दिल्या. तर काहींनी सरकार कोणतेही येवो, आपण कॅबिनेट मंत्री निश्चित आहात, असे मत गुलाबराव पाटील यांच्याकडे व्यक्त केले.

“शरद पवार काय करतील यावर अवलंबून आहे. परंतु काहीही असले तरी आमच्या हातात ‘जोकर’ आहे. आम्ही ठरवलं तेच होणार, मी मंत्री होवो न होवो. जरी केवळ आमदार राहिलो तरी मंत्र्याकडे जाऊन सर्वसामान्य जनतेचे काम करण्याची धमक आपल्यात आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तास्थापन करण्याची शक्यता दिसत आहे. आज दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्येही लवकरच सत्तास्थापन केली जाईल, असं सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या काही नेत्यांमध्येही मंत्री पदावरुन आतापासून फिल्डिंग सुरु असल्याचे बोललं जात आहे.

उद्या सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय?

बुधवारी (20 नोव्हेंबर) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साडेपाच तासांच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक झाली. दरम्यान उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मित्रपक्षांशी आघाडी चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. त्यामुळे आता मुंबईत सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरु होणार आहेत.

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.