AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झाकीर नाईक आणि राज ठाकरे… गुणरत्न सदावर्ते यांची टीका काय?

जेष्ठ कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. सदावर्तेंनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

झाकीर नाईक आणि राज ठाकरे... गुणरत्न सदावर्ते यांची टीका काय?
sadavarte and thackeray
Updated on: Jul 05, 2025 | 7:13 PM
Share

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकत्र विजयी मेळावा आज मुंबईत पार पडला. मराठी भाषा टिकवण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही काही नेते उपस्थित होते. या मेळाव्यानंतर जेष्ठ कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. सदावर्तेंनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

राज ठाकरे खोटं बोलत आहेत – सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, ‘तुमच्या अवलादी कुठे शिकल्या याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे. राज ठाकरे तुम आज भी झूठी बाते कर रहे हो. तुम झुठे हो. मी पुरावे देतो. ऐका हो ऐका हो राज ठाकरेंचे पितळ उघडं करतो. ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांनो ऐका. तुम्हाला इंग्रजीची गोडी आहे त्याला तुमचा विरोध नाही.’

राज ठाकरे झाकीर नाईकांसारखं बोलत आहेत

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, ‘राज ठाकरे भाषेच्या नावावर देश तोडायला निघाले का? राज ठाकरे अतिरेक्यांची भाषा करत आहेत. पुरावे कशे नष्ट करायचे ही भाषा अतिरेक्यांची आहे. रजा अकादमीवाला झाकीर नाईक आणि राज ठाकरे एका शाळेत शिकलेत का? राज ठाकरे आणि माझे विचार एक होऊ शकत नाहीत. झाकीर नाईक आणि राज ठाकरे सारखं बोलतात. आम्ही सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नथुराम गोडसे यांच्या विचारांवर चालतो.’

केडिया यांचा देशाच्या हितासाठीचा त्रागा होता

व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी बोलणार नाही, शिकणार नाही असं विधान केलं होतं. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, केडिया यांचा देशाच्या हितासाठीचा त्रागा होता, राज ठाकरे-उध्दव ठाकरेंमुळे रोजगाराचे मोठे नुकसान होत आहे. दगडाच्या ठिकाणी नारळ वापरला, तोडफोडीसाठी नारळाचा वापर हे कोणत हिंदूत्व आहे? असा सवालही सदावर्तेंनी राज ठाकरेंना विचारला आहे.

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?
सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?.
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप.
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण.
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे.
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?.
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण.
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले.
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'.
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?.