AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत! लवकरच सदावर्तेंची राजकारणात इन्ट्री?

वकील गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिल रोजी जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर ते आता पुन्हा एसटीच्या कामगारांसाठी सक्रिय झाले आहेत.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत! लवकरच सदावर्तेंची राजकारणात इन्ट्री?
गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 9:43 AM
Share

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunranta Sadavrte) आता एसटी बँकेची (ST Bank) निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटीच्या कामगारांचा पाच महिने संप केल्यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आता एसटी बँकेच्या निवडणुकीला (Bank Election) टार्गेट केलंय. याकरता सदावर्ते स्वतःचे पॅनल उभं करण्याच्या तयारीत आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिल रोजी जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर ते आता पुन्हा एसटीच्या कामगारांसाठी सक्रिय झाले आहेत. मात्र ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट नव्हते. मात्र आता गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट जालंय. सदावर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपले स्वतःचे पॅनल उभे करणार असून तशी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे. एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकलंय. आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नेमकी काय वेगळी जादू करतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

एसटी बँकेबाबत थोडक्यात

एसटी बँक ही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी हक्काची बँक समजली जाते. या बँकमध्ये जवळपास 90 हजार सदस्य असून एसटी बँकेच्या 50 शाखा राज्यभरात आहेत. एसटी बँकेमध्ये दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असल्याचाही अंदाज वर्तवला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी हे पगाराविनाच आहेत. त्यामुळे एसटी बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कर्जाचे हप्तेच भरता आलेले नाहीत. त्यामुळे अशांना एसटी बँकेच्या निवडणुकीत अशा कर्मचाऱ्यांचा मतदानाचा अधिकारही हिरावला जाणार आहे.

निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदे यांनी एसटी बँकेची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी केली आहे. हजारो सदस्यांना मतदान करता येणार नसल्याच्या कारणामुळे त्यांनी पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक प्राधिकरणाकडे केली आहे.

राजकीय चुरस

दोन हजारपेक्षा अधिक ठेवी एसी बँकेत आहे. त्यामुळे अशा बँकेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, यासाठी राजकीय चुरसही पाहायला मिळते. सध्याच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला येत्या काळात गुणरत्न सदावर्ते कशाप्रकारे आव्हान देतात, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.