PMC Election 2022 Ward 31 : पुणे महापालिकेचा वॉर्ड 31 मध्ये भाजपचेच कमळ फुलण्याची शक्यता; विरोधकांच्या व्यूहरचनेकडेही लक्ष

| Updated on: Jul 26, 2022 | 12:50 AM

येत्या निवडणुकीतही हा मतदारसंघ भाजपसाठीच सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाहिला जात आहे, तर विरोधक काय व्यूहरचना आखाताहेत, त्याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

PMC Election 2022 Ward 31 : पुणे महापालिकेचा वॉर्ड 31 मध्ये भाजपचेच कमळ फुलण्याची शक्यता; विरोधकांच्या व्यूहरचनेकडेही लक्ष
पुणे महापालिका
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे यापुढे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणार आहेत. विशेषतः देशाची आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईबरोबरच पुणे (Pune) शहरातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक (Pune Municipal Corporation Election) लवकरच होणार आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष (Political Party) जोरदार तयारीला लागले आहेत. राज्याच्या सत्तेमध्ये अलीकडेच भाजपने मोठा भूकंप घडवला आहे. शिवसेनेतून बंडखोरी करीत नवा शिंदे गट स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले आहे. याच भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 31 ची ओळख आहे. या प्रभागामध्ये मागील अर्थात 2017 च्या निवडणुकीत चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. येत्या निवडणुकीतही हा मतदारसंघ भाजपसाठीच सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाहिला जात आहे, तर विरोधक काय व्यूहरचना आखाताहेत, त्याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. या पार्श्वभूमीवर याच वॉर्डातील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊया.

पुणे महापालिकेचा वॉर्ड 31 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड क्रमांक 31 मधील ठिकाणे

कोथरुड गावठाण, शिवतीर्थ नगर, आझादनगर, टेकडी मारुती मंदिर, मंत्री पार्क, डहाणूकर कॉलनी, वनाज इंजिनिअर्स लिमिटेड या प्रमुख ठिकाणांचा वॉर्ड क्रमांक 31 मध्ये समावेश होतो. कोथरुड गावठाणपासून बळवंतपूरम साम्राज्य, रामकृष्ण परमहंस नगर, माधव बाग सोसायटी, मौर्य विहारपर्यंत या वॉर्डची हद्द आहे.

आरक्षण

यंदाच्या अर्थात 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, शिवतीर्थ नगर- कोथरुड गावठाण या वॉर्डमधील ‘अ’ भाग हा सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे महापालिकेचा वॉर्ड 31 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्डची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 61115
अनुसूचित जाती – 2494
अनुसूचित जमाती – 515

2017 च्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार

पुणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 31 मध्ये चार नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते.

अ. सुशील शिवराम मेंगडे (Sushil Shivram Mengade) (भाजप)
ब. लक्ष्मण देवराम दुधाणे (Laxmi Devram Dhudhane) (राष्ट्रवादी काँग्रेस)
क. वृषाली दत्ताराम चौधरी (Vrushali Dattatray Chaudhari) (भाजप)
ड. राजाभाऊ किसन बराटे (Rajabhau Kisan Barate) (भाजप)

पुणे महापालिकेचा वॉर्ड 31 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुणे शहरात एकूण 58 वॉर्ड असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार नोंद झालेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे अर्थात तीनसदस्यीय 57 वॉर्ड असतील आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 वॉर्ड असणार आहेत. नव्या प्रभागरचनेत एकूण 173 नगरसेवक असतील. त्यानुसार वॉर्ड क्रमांक 31 हा प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तीन नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. यावेळी कुणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडतेय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.