खडसेंचं नाव दुसऱ्या यादीत असावं ही इच्छा : पंकजा मुंडे

| Updated on: Oct 02, 2019 | 7:53 PM

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे कौटुंबीक संबंध होते. पंकजा मुंडे (Pankaja Munde Eknath Khadse) यांनीही यापूर्वीच खडसे पुढच्या मंत्रिमंडळात असावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

खडसेंचं नाव दुसऱ्या यादीत असावं ही इच्छा : पंकजा मुंडे
Follow us on

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव भाजपच्या दुसऱ्या यादीत असावं, अशी इच्छा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde Eknath Khadse) यांनी व्यक्त केली. भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे कौटुंबीक संबंध होते. पंकजा मुंडे (Pankaja Munde Eknath Khadse) यांनीही यापूर्वीच खडसे पुढच्या मंत्रिमंडळात असावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

पहिल्या यादीत नावं आलं नाही म्हणजे पत्ता कट झाला असा अर्थ होत नाही. मतदारसंघनिहाय त्याचे काही निकष असतात. भाजपची आणखी काही नावं जाहीर होणार आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. एकनाथ खडसेंचं नाव पुढच्या यादीत असावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

खडसेंच्या मुलीला तिकीट मिळण्याची शक्यता

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Eknath Khadse) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसे (Rohini Eknath Khadse) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

गेल्या सहा वेळेपासून भाजपाकडून मुक्ताईनगरातून निवडून येणारे खडसे त्यांचं पहिल्या यादीत नाव नसल्याने कमालीचे निराश झाले आहेत. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत पुढच्या यादीत नाव येईल असा आशावाद व्यक्त केला.

VIDEO : पंकजा मुंडे यांची संपूर्ण मुलाखत