मनसेला घाबरत नाही, आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलंय, जलील यांचं राज ठाकरेंना उत्तर

| Updated on: Jan 24, 2020 | 12:59 PM

इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel on Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे.

मनसेला घाबरत नाही, आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलंय, जलील यांचं राज ठाकरेंना उत्तर
Follow us on

औरंगाबाद : “इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का?” असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel on Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. “धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय?” असा सवाल राज ठाकरे (Imtiyaz Jaleel on Raj Thackeray) यांनी मनसेच्या महाअधिवेशनात उपस्थित केला होता. तसंच राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देत, सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली.

याबाबत इम्तियाज जलील म्हणाले, “इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का? फक्त राजकारणासाठी हा मुद्दा आता बाहेर आणला जात आहे. शिवसेना सेक्युलर झाली त्यामुळे आता मनसेसाठी जमीन तयार झाली आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी मनसे राजकारण करत आहे”

आम्ही मनसेला घाबरत नाही, आम्ही आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलं आहे, त्यामुळे एमआयएम कुणालाही घाबरत नाही, असं इम्तियाज जलील यांनी ठणकावलं.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय? नमाज का पढता असं आम्ही म्हणत नाही. भोंगा लावून नमाज का पढता? किती बांग्लादेशी भारतात आले याचा काहीच अंदाज नाही. हे बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावा असं अनेक वर्षांपासून सांगतो आहे. तेव्हा कुणी नाही म्हणालं, हिंदुत्वाकडे जात आहात? भारत काय धर्मशाळा नाही. कुणीही येथे यावं आणि येथे राहावं, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सीएएच्या समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मोर्चा काढू”, असं राज ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या  

राज ठाकरेंचा नागरिकत्व कायद्याला पाठिंबा, मनसेचा 9 फेब्रुवारीला मोर्चा!