बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार ? संजय राऊतांनी सांगितलं सत्य

| Updated on: Oct 13, 2020 | 10:47 AM

बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हदेखील दिलं आहे.

बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार ? संजय राऊतांनी सांगितलं सत्य
Follow us on

मुंबई : बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढणार असल्याच्या राजकीय चर्चा सध्या सुरू आहेत. या निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हदेखील दिलं आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. (in bihar election shivsena ncp alliance is not been decided yet said by sanjay raut)

बिहार निवडणूकीत कुणासोबत युती करायची याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर ‘बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात पाटन्याला जाणार आहे. त्यावेळी यावर चर्चा होईल’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही असं करणार आहात का? असा प्रश्न विचारला असता आम्ही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू एवढी आमची ताकद नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं. खरंतर, महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांनी ऐतिहासिक निर्णय घेत एकत्र सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप शिवसेनेवर नाराज आहे. हीच नाराजी आता बिहार निवडणुकांमध्येही दिसते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. (in bihar election shivsena ncp alliance is not been decided yet said by sanjay raut)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरला हलवून पर्यावरणाचे रक्षण केलं आहे. ते एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी केलं.

राज्य सरकारनं मेट्रो-३ प्रकल्पाची आरे परिसरातील नियोजित कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला टोला लगावला.

इतर बातम्या –

एक्स्प्रेस वेवर गस्त घालणाऱ्या पोलिसाला ट्रकचा धक्का, जागेवरच मृत्यू

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

(in bihar election shivsena ncp alliance is not been decided yet said by sanjay raut)