
MLA Disqualification Case | सगळ्या देशाच लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल वाचन केलं. कारण आजचा महाराष्ट्र विधिमंडळातील निकाल भविष्यात अशाच प्रकारच्या अन्य प्रकरणात मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे सगळ्या देशाच लक्ष महाराष्ट्र विधिमंडळातील निकाल वाचनाकडे होते. शिंदे गट की, उद्धव ठाकरे गट असा प्रश्न होता. अखेर राहुल नार्वेकर यांनी 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य मानून निकाल दिला. त्यानुसार, राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला वैध ठरवलं. त्यामुळे 16 आमदारांवरील अपात्रतेचा धोका टळलाय. त्यांनी शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य केलं. 23 जानेवारी 2018 रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती. शिंदे गटाने 1999 सालची पक्षाची घटना दिली होती, त्याला विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवलय. 2018 सालची घटना वैध ठरवण्याची उद्धव ठाकरे गटाची मागणी फेटाळून लावलीय.
आधीच सुरु झालेली टीका
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महानिकालाच वाचन करण्याआधी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका सुरु होती. निकाल आधीच ठरलाय. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार, असं सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले होते.
येह तो होना ही था ……#ठाकरे
न्याया ची अपेक्षा कोणा कडून करता …
जनता न्याय करेल— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2024
जितेंद्र आव्हाड यांची पाच शब्दात प्रतिक्रिया काय?
आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही तीच भूमिका घेतली आहे. अलीकडचे प्रभू रामचंद्रांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी फक्त पाच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. येह तो होना ही था …… असं त्यांनी म्हटलय.