राज्य अनलॉक, आता पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार : आदित्य ठाकरे

| Updated on: Dec 13, 2020 | 8:12 AM

कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार असल्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

राज्य अनलॉक, आता पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार : आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात खूप सुसंधी आहेत. राज्यात पर्यावरणाचे रक्षण, त्याचबरोबर उद्योगांना चालना आणि पर्यटन विकासास प्रोत्साहन देण्यात येत आहे. कोरोनोत्तर काळात राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव असून त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत या क्षेत्राला चालना देण्यात येईल. या माध्यमातून राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (In the post-Corona period, tourism development and employment generation will be boosted in the state Aditya Thackeray)

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहयोगाने राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी असलेल्या जागेवर आदरातिथ्य व्यवसायातील विविध खाजगी संस्थांचा सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने सुसंवादाचा कार्यक्रम शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात झाला. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्यांची संख्या 70 वरुन 10 पर्यंत कमी करण्यात आली आहे. राज्याचे कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ अंतर्गत राज्यातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यात पर्यटन विकासास मोठा वाव असून पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजकांना शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदरातिथ्य व्यावसायिकांना उद्योगातील सवलती, राज्यातील विविध ठिकाणे, वास्तू येथे पर्यटनासाठी केलेले सामंजस्य करार अशी अनेक महत्त्वाची पावले पर्यटन विभाग टाकत आहे. सद्यस्थितीत पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवित आहे. यातून पर्यटकांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे राज्य पर्यटनात अव्वल असेल, असा विश्वास पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

(In the post-Corona period, tourism development and employment generation will be boosted in the state Aditya Thackeray)

हे ही वाचा :

Aaditya Thackeray | जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक, अर्भकाला मदतीचा हात, आदित्य ठाकरेंचे वाढदिवशी स्तुत्य पाऊल