जळगावमधील भाजपचे 27 नगरसेवक अपात्र ठरणार? नाशिक विभागीय आयुक्तांकडे निर्णय

| Updated on: Apr 01, 2021 | 10:30 AM

शिवसेनेने नगरसेवक फोडल्यामुळे भाजपवर नामुष्की पत्करण्याची वेळ आली. राज्यातील नगरसेवकांची ही मोठी फूट ठरली आहे. (Jalgaon BJP petition against rebellious corporators)

जळगावमधील भाजपचे 27 नगरसेवक अपात्र ठरणार? नाशिक विभागीय आयुक्तांकडे निर्णय
भाजप नेते गिरीश महाजन
Follow us on

नाशिक : जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यात बहुमत असतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली. (Jalgaon Mayor Election BJP petition against rebellious corporators)

तीस हजार पानांची याचिका

शिवसेनेने नगरसेवक फोडल्यामुळे भाजपवर नामुष्की पत्करण्याची वेळ आली. राज्यातील नगरसेवकांची ही मोठी फूट ठरली आहे. त्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्र ठरवण्याची कारवाई करावी, यासाठी भाजपकडून नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असल्याचं सांगण्यात येतंय.

भाजपकडे पुरावे

जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी ही याचिका दाखल केलीय. पक्षाच्या फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे याबाबत ही याचिका असून नगरसेवकांना घरी जाऊन बजावला गेलेला व्हिप, जाहीर व्हिप, नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान, असे अनेक पुरावे या याचिकेसोबत जोडण्यात आलेत.

भाजपने दाखल केलेली तीस हजार पानांची ही याचिका राज्यातील महापालिकेच्या इतिहासात पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय आहे गेम?

इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एमआयएम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, असं असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. (Jalgaon Mayor Election BJP petition against rebellious corporators)

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

“मी मुख्यमंत्र्यांना, मंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं, 15 तुमचे आहेत. 25 माझ्याकडे येतील. 40 नगरसेवक होऊ शकतात. 3 एमआयएमचे आधीच आले होते. बंडखोर 22 लोकं होते. ते जवळपास महिन्याभरापासून माझ्या आणि माझ्या दोन कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते” अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मांडली होती.

संबंधित बातम्या

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

जळगावात भाजपचे 27 नगरसेवक कसे फुटले, 15 संख्याबळ असताना शिवसेनेचा महापौर कसा? आतल्या घडामोडी काय?

(Jalgaon Mayor Election BJP petition against rebellious corporators)