मोठी अपडेट समोर! RSSच्या पथसंचलनाच्या वेळी राडा, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना…
जळगावच्या किनगावात आरएसएसच्या पथसंचलन उभे असताना अचानक पोलिसांवर दगडफेक झाली. या घटनेनंतर जळगावमधील वातावरण तापले. आता प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

जळगावमधील किनगावात वातावारण सध्या चांगलेच तापले आहे. काल आरएसएसचे पथसंचलन उभे असताना एका गटाकडून पोलिसांवर दगडफेकी करण्यात आली. त्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन परिसरात मोठी खळबळ माजली. या दगडफेकीमध्ये सात ते आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या किनगाव येथील दगडफेकीच्या घटने प्रकरणी 50 ते 60 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 ते 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे.
वाचा: क्रिकेट जगतात खळबळ! १८ वर्षीय प्रसिद्ध खेळाडूचे अचानक निधन
स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात
दगडफेकीच्या घटनेनंतर आज किनगाव गावात जनजीवन सुरळीत आहे. तसेच तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे. किनगावमध्ये एस आर पी एफ, आरसीबी प्लातून सह स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून रात्री किनगावमध्ये भेट देत पाहणी करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या यावल तालुक्यातील किनगावात आरएसएसकडून पथसंचलन सुरू होते. पथसंचलन सुरू असतानाच अचानक एका गटाने पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेने किनगावात गोंधळ निर्माण झाला. आरएसएसच्या रॅलीला एका गटाने विरोध होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देथील पथसंचलन सुरू होते. सौम्य लाठीचार्ज सुरू केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अनेक सूचना देखील केल्या. जमाव पांगल्यानंतर पथसंचलन पोलिस बंदोबस्तमध्ये सुरळीत पार पडले. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.