‘माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही’, जयंत पाटलांचं ट्वीट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन

स्वत: जयंत पाटील यांनी एक ट्वीट करुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही, जयंत पाटलांचं ट्वीट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 7:59 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळतेय. अशावेळी स्वत: जयंत पाटील यांनी एक ट्वीट करुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. (Jayant Patil admitted to hospital, Jayant Patil’s tweet that he is in good health)

‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाल्यामुळे चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे.

सांगलीच्या पूरस्थितीत रस्त्यावर उतरुन पाहणी करत मदतकार्य

सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना देत पाहणी केली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं. अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं.

इतर बातम्या :

Cabinet Meeting : पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ 10 हजारांची मदत

Maharashtra Cabinet : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसाठी आदिती तटकरे यांच्या 3 प्रमुख मागण्या, मंत्रिमंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद

Jayant Patil admitted to hospital, Jayant Patil’s tweet that he is in good health