शपथविधीपूर्वीच एनडीएत नाराजी, जेडीयू सरकारमधून बाहेर

| Updated on: May 30, 2019 | 6:37 PM

नवी दिल्ली : एनडीएचं सरकार दुसऱ्यांदा स्थापन होतंय. पण सरकारमध्ये बिहारमधील पक्ष जेडीयू सहभागी होणार नाही. मोदी कॅबिनेटमध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी जेडीयूला अपेक्षा होती. पण भाजपने ही मागणी फेटाळली आहे. 16 जागा असलेल्या जेडीयूने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय. पण जेडीयू एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून कायम असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, आरसीपी सिंह […]

शपथविधीपूर्वीच एनडीएत नाराजी, जेडीयू सरकारमधून बाहेर
Follow us on

नवी दिल्ली : एनडीएचं सरकार दुसऱ्यांदा स्थापन होतंय. पण सरकारमध्ये बिहारमधील पक्ष जेडीयू सहभागी होणार नाही. मोदी कॅबिनेटमध्ये दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी जेडीयूला अपेक्षा होती. पण भाजपने ही मागणी फेटाळली आहे. 16 जागा असलेल्या जेडीयूने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय. पण जेडीयू एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून कायम असेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरसीपी सिंह आणि लल्लन सिंह यांना केंद्रीय मंत्री बनवलं जावं, अशी जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांची मागणी होती. तर संतोष कुशवाह यांच्यासाठी राज्यमंत्रिपद मागितलं होतं. पुढच्या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिपदाच्या माध्यमातून नितीश कुमार जातीय समीकरणंही साधत होते. पण ही मागणी अमान्य करण्यात आली.

आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती जेडीयू नेते बशिष्ठ नारायण सिंह यांनी दिली. शिवाय एनडीएमध्ये राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रत्येक मित्रपक्षाकडून एक एक मंत्री बनवला जाईल, असं बोललं जातंय. शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत शपथ घेणार आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. अकाली दलकडून हरसिमरत कौर पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. लोक जनशक्ती पक्षाकडून रामविलास पासवान, आरपीआयकडून रामदास आठवले, एआयडीएमकेकडून माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचे चिरंजीव रवींद्रनाथ आणि अपना दलकडून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद मिळेल.