AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झारखंड विधानसभा अंतिम निकाल, भाजप आऊट, मुख्यमंत्रीही पडले, हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री!

झारखंड विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल (Jharkhand election result) जाहीर झाले आहेत. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिली.

झारखंड विधानसभा अंतिम निकाल, भाजप आऊट, मुख्यमंत्रीही पडले, हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री!
| Updated on: Dec 24, 2019 | 11:15 AM
Share

रांची : झारखंड विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल (Jharkhand election result) जाहीर झाले आहेत. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिली. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालं. काँग्रेस आघाडीने 81 पैकी 47 जागा मिळवत, विजय खेचून आणला. सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं. (Jharkhand election result) झारखंडमध्ये 41 हा बहुमताचा आकडा आहे.

या विजयानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करणार आहे. महाआघाडीचे नेते हेमंत सोरेन येत्या 27 डिसेंबरला झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. रांचीतील मोराबादी मैदानात हेमंत सोरेन यांच्यासह जेएमएमचे 6, काँग्रेसचे 5 आणि आरजेडीचा 1 आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल. म्हणजे हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याशिवाय 12 सहकारी असतील.

महत्त्वाचं म्हणजे भाजप नेते रघुवर दास यांचं सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. रघुवर दास यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.  जमशेदपूर पूर्व या जागेवरुन रघुवर दास निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघाचा निकाल सर्वात शेवटी जाहीर झाला. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार रघुवार दास यांचा 15833 मतांनी पराभव झाला.

भाजप 37 वरुन 25 वर घसरली

झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला. सत्ता तर गेलीच पण भाजप 37 जागांवरुन 25 जागांवर घसरली. 2014 मध्ये भाजपने 72 जागा लढवत 37 जागांवर विजय मिळवला होता.

झारखंड विधानसभा निकाल

या निवडणुकीत एकट्या झारखंड मुक्ती मोर्चाला 30 जागांवर विजय मिळाला. हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  भाजप 25 जागांसह दुसऱ्या, तर काँग्रेस 16 जागांसह तिसऱ्या जागी राहिली.

70 हजार मतांनी जिंकणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. झारखंडचे मावळते मुख्यमंत्री रघुवर दास हे 2014 मध्ये 70 हजार 157 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांचा 15 हजार मतांनी पराभव झाला. याशिवाय रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांचाही पराभव झाला.

रघुवर दास हे जमशेदपूर पूर्व या मतदारसंघातून तब्बल 5 वेळा विजयी झाले होते. मात्र यंदा भाजपचे बंडखोर नेते सरयू राय यांनी त्यांचा पराभव केला.

हेमंत सोरेन यांचा दोन्ही मतदारसंघात विजय

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असलेले हेमंत सोरेन हे दुमका आणि बरहेट या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले. दुमका मतदारसंघात त्यांनी भाजपच्या डॉक्टर लुईस यांचा 13,188 मतांनी पराभव केला. लईस या रघुवर सरकारमध्ये मंत्री होत्या. तर बरहेट मतदारसंघात हेमंत सोरेन यांनी 25 हजार 740 मतांनी विजय मिळवला.

झारखंड विधानसभा निवडणूक निकाल – 2019

पक्ष विजयी
एजेएसयू पार्टी

 

2
भाजप

 

25
सीपीआय-M

 

01
अपक्ष

 

02
काँग्रेस

 

16
झारखंड मुक्ती मोर्चा 30
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) 03
राष्ट्रवादी काँग्रेस 01
राष्ट्रीय जनता दल (राजद) 01
एकूण 81
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.